नेशन न्यूज मराठी टीम.
वर्धा / प्रतिनिधी – पत्रकारांच्या न्याय्य मागण्यांकरिता महात्मा गांधी पुतळ्यालगत धरणे आंदोलन करण्यात आले. ज्या पत्रकारांना पत्रकारितेमध्ये दहा वर्षे पूर्ण झाली आहेत, अशा पत्रकारांना अधिस्वीकृती कार्ड देण्यात यावे. राज्याच्या माहिती महासंचालनालयाने शासनाचे पोर्टल तयार करून, त्या पोर्टलवर नव्याने पत्रकारितेत पदवी पूर्ण करून किमान तीन महिने पत्रकारितेचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे, अशांना पत्रकार म्हणून प्रमाणपत्र देण्यात यावे. (जसे की बार कौन्सिल वकिलांना वकिली करण्याचा अधिकृत परवाना देते तसे पत्रकार असल्याचा अधिकृत परवाना मिळावा.)अशा विविध मागण्यांना घेऊन व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने सदर आंदोलन करण्यात आले.
यावेळी खासदार रामदास तडस यांनी या आंदोलनाला भेट दिली आहे. तसेच सदर मागण्या शासन दरबारी लावून धरणार असे आश्वासन सुद्धा यावेळी त्यांनी दिलेलं आहे. तसेच यावेळी सावंगी मेघे येथील विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. अभ्युदय मेघे यांनी सुद्धा या आंदोलन स्थळी भेट दिली आहे.