नेशन न्यूज मराठी टीम.
टिटवाळा– वसई तालुक्यातील भाताणे येथील कला शिक्षक असलेल्या कौशिक जाधव या चित्रकाराने आषाढी एकादशी निम्मिताने कडधान्यांचा उपयोग करून. चक्क विठू माऊली साकारली आहे. ही कलाकृती त्यांनी अवघ्या २० मिनीटांचा कालावधी मध्ये पूर्ण केली आहे.
त्यासाठी चित्रकार कौशिक जाधव यांनी तूरडाळ, मसूरडाळ, मुगडाळ, चवळी, वाटाने, चणे, व अन्य कडधान्यांचा वापर कलाकृती मध्ये केला आहे.देव चरा चरा मध्ये आहे. हे कौशिक जाधव यांच्या कलाकृती मधून दिसून येत आहे.. तसेच चित्रकार कौशिक जाधव यांनी याआधी देखील पानांफुलातून तसेच तांत्रिक उपकरणे आणि पेन पट्टी पेन्सिल यांच्या साह्याने ही विठूमाऊली साकारली होती. , अश्या अन्य १२ वेगवेगळ्या प्रकारे विठू माऊली साकारले आहेत.कौशिक जाधव हे वसईतील डॉ. एम. जि. परुळेकर व न्यू इंग्लिश स्कूल, वसई च्यां शाळेत कलाशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. आपल्या कलेच्या माध्यमातून ते ही कला शाळेतील मुलांनाही शिकवत आहेत. त्यांच्या या कलाकृतीचे कौतुक होत असुन शाळेच्या प्राचार्या एस.एल.वाझ व शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी त्यांना यासाठी प्रोत्साहन देत असतात.