प्रतिनिधी.
डोंबिवली – कल्याण येथील खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत नागरिकांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने, चैन खेचून पसार झालेल्या सोनसाखळी चोरट्यांना काही दिवसांपूर्वी खडकपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या.या चोरीत त्यांचा एक साथीदार निकेत जनार्दन पाटील ( २१, रा.आमने गाव, तालुका भिवंडी ) हा फरार होता. त्याचा पोलीस कसून शोध घेत होते.त्याच्यावर विष्णूनगर पोलीस ठाण्यात मोबाईल आणि मोटरसायकल चोरी असे गुन्हे दाखल होते.या गुन्ह्यातहि पोलीस निकेतचा शोध घेत होते.विष्णूनगर पोलिसांना खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार,निकेत कल्याण बायपास कोनगावजवळ येणार आहे.सदर ठिकाणी पोलिसांनी सापळा रचला.निकेत हा या ठिकाणी येताच पोलिसांनी त्याचा पाठलाग करून पकडले.कल्याण परिमंडल -३ चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे व डोंबिवलीचे सहाय्यक पोलीस आयुक्त जयराम मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली विष्णूनगर पोलीस ठाण्याचे वपोनि संजय साबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वडणे,पो.ना.भगवान सांगळे,सचिन कांगणे, राजेंद्र पाटणकर, पो.शि.कुंदन भांबरे पथकाने कामगिरी बजावली.