Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
Default Image ठाणे थोडक्यात

कल्याणात हळदी समारंभात नियमांचे उल्लंघन,गुन्हा दाखल

कल्याण/ प्रतिनिधी – संचारबंदीची ऐशी की तैसी करीत कल्याण पूर्वेतील चिंचपाडा गावात हळदी सभारंभात बैल नाचवत, बैलावर पैसे उडवित पैशाची उधळण केल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर वायरल झाला होता. या हळदी समारंभास  मोठ्या संख्येने लोकांची उपस्थिती असल्याचे देखील दिसून आले. हळदीत बैल नाचवणे महागात पडले असून हा हळदी समारंभ आयोजित करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

महाराष्ट्रात तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातही कोरोना साथीचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे त्यावर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीकोनातून शासनाच्या आदेशानुसार आता १४ एप्रिल  वाजल्यापासून १ मे सकाळी ७ वाजेपर्यंत निर्बंध लागू करण्यात आले आहेत. कोरोना साथीला अटकाव करण्यासाठी नागरिकांनी या निर्बंधांचे पालन करणे अपेक्षित आहेत,  असे असताना कल्याण पूर्व येथील चिंचपाडा परिसरातील वैभव प्रकाश म्हात्रे व प्रकाश महादू म्हात्रे यांनी लग्नाच्या हळदी समारंभात सोशल डिस्टसिंगचे पालन न करता मास्कचा वापर न करता मनाई आदेशाचा भंग केला.

त्यामुळे आय प्रभागक्षेत्र अधिकारी दिपक शिंदे यांनी विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन येथे वैभव प्रकाश म्हात्रे व प्रकाश महादू म्हात्रे यांच्या विरुद्ध भा.द.वि कलम १८८ साथरोग प्रतिबंध कायदा १८९७  चे कलम ३(१) आणि राष्ट्रीय आपत्ती कायदा २००५ चे कलम ५१(बी) प्रमाणे तक्रार दाखल केली आहे.

कोरोना साथीच्या आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी वारंवार हात धुणे सार्वजनिक ठिकाणी वावरताना न चुकता मास्कचा वापर करणे,  सामाजिक अंतर पाळणे या त्रिसूत्रीचा कटाक्षाने अवलंब करावा, असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
X