नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
जळगाव/प्रतिनिधी – नदीत बुडालेल्या तरुणाचा शोध घेण्यासाठी पाण्यात उतरलेल्या एसडीआरएफ च्या पथकावर काळाने घात केला. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील सुगाव गावाजवळ गुरुवारी मोठी दुर्घटना घडली. प्रवरा नदीत बोट उलटल्याने तीन जवानांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मुंबई येथून मदतकार्यासाठी आलेल्या टीममधील तीन जण व स्थानिक दोन जण अशा पाच जणांचा मृतांमधे समावेशआहे.
या घटनेत जळगाव जिल्ह्यातील भडगाव गावातील वैभव वाघ यांना वीरगती प्राप्त झाली. एसडीआरएफच्या बचाव कार्यात हुतात्मा झालेले वीर जवान वैभव सुनील वाघ यांना आज शासकीय इतमामात आणि अत्यंत शोकाकुल वातावरणात अंतिम निरोप देण्यात आला. याप्रसंगी तालुक्यातील मान्यवर आणि प्रशासकीय अधिकार्यांसह परिसरातील हजारो नागरिकांची उपस्थिती होती. माजी सैनिक व त्रिदल सेना अध्यक्ष आबासाहेब गरुड यांनी हुतात्मा जवान वैभव वाघ यांची पुतळ्याची गावात मागणी केली, असून गावात लवकरच पुतळ्याचे काम पूर्ण होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
शहीद वैभव वाघ हे पांढरद तालुका भडगाव येथील रहिवासी आहे. त्यांचे शिक्षण भडगाव येथे झाले. वैभव यांचा जन्म झाल्याच्या अवघ्या 17 दिवसानंतरच त्यांच्या वडीलांचे निधन झाले. त्यामुळे लहानपणीच त्यांच्या डोक्यावरून पितृछाया हरपली. वैभव वाघ यांच्या आईनेच काबाडकष्ट करून त्यांचे पालन केले. पण आता त्यांच्या निधणानंतर आई संगीताबाई वाघ व पत्नी शितल वाघ ह्यांचा आधारस्तंभ हरपला आहे. तसेच वैभव वाघ यांच्या जाण्याने सहा वर्षाचा मिताशू व तीन वर्षाचा ऋतिक ह्या दोन्ही मुलांचे छत्र हरपले आहे. वाघ कुटुंबावर आलेल्या अचानक संकटाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.