नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
अहमदनगर/प्रतिनिधी – संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीचा जय्यत प्रचार सुरू आहे. एकमेकांचे विरोधी पक्ष एकमेकांवर टिकास्त्र दागताना दिसत आहेत. त्यात अहमदनगर मध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार यांनी स्वाभिमान जनसंवाद यात्रा काढून जनतेला भेटी देत आहेत, त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. व आपला प्रचार करीत आहेत.
स्वाभिमान जनसंवाद यात्रेला सर्वच तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळत असून ही निवडणूक जनतेने हाती घेतली असून वाड्या वस्तीवर देखील यात्रेचे जोरदार स्वागत होत आहे. विखे फक्त बोलतात मी जे बोलतो तेच करतो.असा पाण्याच्या प्रश्नावर निलेश लंके यांनी विखेंना खोचक टोला लगावला आहे.
आमदारकीच्या कार्यकाळात पारनेर मतदारसंघात अनेक विकासाची कामे केली. त्यामुळे आगामी काळात देखील येथील प्रश्न सोडविण्याचे काम केले जाईल. साकळाई योजनेचा देखील पाठपुरावा केला होता. परंतु मधल्या काळात सत्तांतर झाल्याने कामे ठप्प झाली होते. परंतु हाती घेतलेले काम पूर्णत्वास नेण्याचा काम केले जाईल असे आश्वासन लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी दिले. निलेश लंके यांची स्वाभिमान जनसंवाद यात्रेला श्रीगोंदा तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळत असून तालुक्यातील जनतेत जावून मूलभूत प्रश्न जाणून घेण्याचे काम चालू आहे. त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.