नेशन न्यूज मराठी नेटवर्क.
नवी दिल्ली/प्रतिनिधी – एखाद्या व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी प्रत्यक्ष किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात आधार स्वीकारण्यापूर्वी, संस्थांनी आधारची पडताळणी करणे आवश्यक आहे.भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) ने नमूद केले आहे की आधार धारकाच्या संमतीनंतर आधार क्रमांकाची पडताळणी करणे हे एखाद्या व्यक्तीने सादर केलेल्या कोणत्याही प्रकारच्या आधार (आधार पत्र, ई-आधार, आधार पीव्हीसी कार्ड, आणि एम-आधार) खरेपणा तपासण्यासाठी योग्य पाऊल आहे.
यामुळे अप्रामाणिक आणि असामाजिक घटक कोणत्याही संभाव्य गैरवापरात सहभागी होण्याला आळा बसतो. हे कोणताही 12-अंकी क्रमांक आधार नाही या युआयडीएआयच्या भूमिकेचे समर्थन करते. आधार दस्तावेजांची छेडछाड झाली असल्यास ऑफलाइन पडताळणीद्वारे त्याचा शोध घेता येऊ शकतो. छेडछाड हा दंडनीय गुन्हा असून आधार कायद्याच्या कलम 35 अंतर्गत दंडास पात्र आहे.
युआयडीएआय ने वापरापूर्वी आधार पडताळणीच्या आवश्यकतेवर भर देण्याची राज्य सरकारांना विनंती केली आहे आणि राज्यांना आवश्यक निर्देश देण्याचे आवाहन केले आहे जेणेकरून जेव्हा ओळखपत्राचा पुरावा म्हणून आधार सादर केले जाईल – तेव्हा आधार वापरून संबंधित संस्थेद्वारे रहिवाशाचे प्रमाणीकरण/पडताळणी केली जाईल.
युआयडीएआयने संस्थाना प्रमाणीकरण/पडताळणीसाठी विनंती केली असून तसे अधिकार देणारी परिपत्रके देखील जारी केली आहेत ज्यात पडताळणीच्या आवश्यकतेवर भर आणि प्रोटोकॉलचे पालन करण्यास सांगितले आहे.
mAadhaar App, किंवा Aadhaar QR कोड स्कॅनर वापरून सर्व प्रकारच्या आधार (आधार पत्र , ई-आधार, आधार पीव्हीसी कार्ड आणि m-Aadhaar) वर उपलब्ध QR कोड वापरून कोणत्याही आधारची पडताळणी केली जाऊ शकते. QR कोड स्कॅनर Android आणि iOS आधारित मोबाइल फोन तसेच विंडो-आधारित ऍप्लिकेशनसाठी विनामूल्य उपलब्ध आहे.
रहिवासी स्वेच्छेने त्यांचे आधार कागद किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात सादर करून त्यांची ओळख पटवण्यासाठी आधार क्रमांक वापरू शकतात. युआयडीएआयने यापूर्वीच रहिवाशांसाठी काय करावे आणि काय करू नये याबद्दल माहिती प्रसिद्ध केली असून रहिवासी आत्मविश्वासाने त्यांचे आधार वापरू शकतात.
Related Posts
-
बीएसएनएलच्या १५ आधार सर्व्हिस सेंटरचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली- केंद्र सरकारने मेक इन इंडिया…
-
मराठवाड्यात नवजात बालकांचा आधार ठरणार मानवी मिल्क बँक
नेशन न्यूज मराठी टीम. संभाजीनगर / प्रतिनिधी -बदलत्या जीवनशैलीचा परिणाम…
-
जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई/प्रतिनिधी - सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राज्य…
-
शिधापत्रिकाधारकांच्या आधार संलग्नीकरणात यवतमाळ जिल्हाने मारली बाजी
नेशन न्यूज मराठी टीम. यवतमाळ/प्रतिनिधी - अन्नधान्य वितरणातील अपहार, गैरव्यवहार…
-
युआयडीएआय घेऊन आले “रीइमॅजिन आधार” संकल्पना
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - नागरिकांना आधार ओळख…
-
क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी आता ऑनलाईन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय पदकप्राप्त खेळाडूंच्या…
-
नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी, शासकीय योजनांच्या लाभासाठी आधार कार्ड लिंक करा
मुंबई - राज्य शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता…
-
मुंबईतील आधार संरक्षण भिंतींच्या प्रश्नी वंचितची आमरण उपोषणाची हाक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - मुंबईत डोंगर उतारावरील असलेल्या…
-
माय माऊलीच्या जन्माचा उत्सव अनवणी पायांना आधार देऊन केला साजरा
सोलापूर/प्रतिनिधी - सोलापूर शहर पोलीस शिपाई शांतीसागर जेनुरे यांनी आपल्या…
-
ऑनलाईन सेवांसाठी आधार नोंदणीकृत मोबाईल नंबर अपडेट करणे आवश्यक
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - ऑनलाईन…
-
लोकसेवा हक्क अधिनियमामध्ये जात प्रमाणपत्र पडताळणी सेवेचा समावेश
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील पात्र व्यक्तींना पारदर्शक,…
-
आता मतदार कार्ड होणार 'आधार' शी लिंक, १ ऑगस्टपासून विशेष मोहिम
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे - भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार…
-
दहा वर्षांपूर्वी जारी झालेल्या आधार कार्ड धारकांनी आपली कागदपत्रे अद्ययावत करावी -युआयडीएआयचे आवाहन
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - ज्या राहिवाशांना दहा…
-
आधार कार्ड संबंधीत होणारी फसवणूक टाळण्यासाठी अपडेट करा ‘आधार’
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - देशातील पहिले आधार कार्ड…
-
२५ फेब्रुवारीला जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी ऑनलाईन प्रक्रियेच्या मार्गदर्शनासाठी वेबिनारचे आयोजन
मुंबई प्रतिनिधी- जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी ऑनलाईन प्रक्रियेबाबतच्या मार्गदर्शनासाठी ऑनलाइन…
-
मतदान केंद्रांच्या जागेची १०० टक्के प्रत्यक्ष पडताळणी मोहीम सुरु
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - भारत निवडणूक…
-
बनावट सिमकार्डना आळा घालण्यासाठी सहा लाख ऐंशी हजार संशयित कनेक्शनची फेर-पडताळणी
NATION NEWS MARATHI ONLINE. नवी दिल्ली/प्रतिनिधी - बनावट सिमकार्डचा वापर…
-
केडीएमसी क्षेत्रातील आरटीई प्रवेशासाठी निवड झालेल्या बालकांच्या कागदपत्राची १३ ते २५ एप्रिला पडताळणी
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - बालकांचा मोफत व…