नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
नवी मुंबई/प्रतिनिधी– नवी मुंबईतील वाशी पोलीस ठाण्यात दोन दिवसापूर्वी पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या गाडीतून लॅपटॉप चोरीची तक्रार दाखल झाली होती. सीसीटीव्ही आणि तांत्रिक मदतीने दोन चोरांना छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्टेशन परिसरातून वाशी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या चोरांकडून वाशी मधून चोरीला गेलेल्या दोन लॅपटॉप सह एकूण सात लॅपटॉप आणि इतर मुद्देमाल हस्तगत केला असून अधिकच्या चौकशीत या दोन्ही सराईत चोरांवर राज्यातील पुणे,नाशिक,नवी मुंबई सह मुंबई मध्ये एकूण 9 चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले असून त्यांच्यावर अजून काही गुन्हे दाखल असल्याचा संशय पोलिसांना असून याबाबत अधिक तपास सुरू असल्याचे वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चांदेकर यांनी सांगितले आहे.