नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
नागपूर/प्रतिनिधी – शांतीच्या वाटेवरून ज्ञानाची प्राप्ती करण्याच मार्ग ज्यांनी संपूर्ण मानवजातीला दाखवला असे बौधिसत्व गौतम बुद्ध यांचा आज जन्मदिवस आहे. बुद्धांचा जन्म इ.स.पूर्व ६२३ मध्ये दक्षिण नेपाळच्या तराई प्रदेशात असलेल्या लुंबिनीच्या बागेत झाला होता. ही तारीख वैशाख महिन्यातील पौर्णिमा होती. म्हणून दरवर्षी गौतम बुद्धांचा जन्मदिवस ‘बुद्ध पौर्णिमा’ म्हणून साजरा केला जातो. यावर्षी बुद्ध पौर्णिमा 23 मे रोजी म्हणजेच आज आहे. बुद्ध पौर्णिमेचा हा दिवस जगभरात वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो. काही ठिकाणी याला बुद्ध जयंती, तर कुठं पीपल पौर्णिमा असही म्हणतात.
बुद्ध जयंती भारतात खूप उत्साहात साजरी केले जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूर जिल्ह्यात दरवर्षी बुद्ध पौर्णिमेचे वेगळेच आकर्षण पाहायला मिळते. वनागपुरातील दीक्षाभूमीवर बुद्ध जयंती साजरी करण्यासाठी अनुयायी मोठ्या संख्येने आले आहेत. हजारो अनुयायी दीक्षाभूमीवर पोहोचून डॉ. बाबासाहेब आणि तथागत बुद्धांना अभिवादन करण्यासाठी एकत्रित आले. दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेश ससाई यांच्या प्रमुख उपस्थितीत सामूहिक बुद्ध वंदना करण्यात आली. गौतम बुद्धाच्या या जन्मदिवसा निमित्ताने शहरात आज दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.