नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण/संघर्ष गांगुर्डे – कल्याण येथील तहसील कार्यालयावर वंचित बहुजन आघाडीच्या कल्याण डोंबिवली शहर विभागाच्या वतीने नांदेड येथे झालेल्या अक्षय भालेराव यांच्या हत्येच्या निषेधार्थ कल्याण येथील तहसील कार्यालयावर थेट धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
तहसीलदार देशमुख यांना विविध मागण्याचे निवेदन वंचित तर्फे देण्यात आले. अक्षय भालेराव यांच्या मृत्यू प्रकरणातील दोषींना जास्तीत जास्त कडक शिक्षा व्हावी यासाठी मागणी करण्यात आली व तसेच ठाणे जिल्ह्यात व कल्याण शहरांमध्ये सामाजिक सलोखा रहावा यासाठी आपल्या तर्फे प्रयत्न करण्यात यावे असे सांगण्यात आले.
या मोर्चाचे नेतृत्व करण्यासाठी ठाणे जिल्हा अध्यक्ष भगवानजी गायकवाड व ठाणे जिल्हा महिला अध्यक्ष मायाताई कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. ठाणे जिल्ह्याचे महासचिव प्रवीण बोदडे, ठाणे जिल्हा महासचिव रेखाताई कुरवारे ,डोंबिवली पूर्वचे अध्यक्ष चंद्रकांत पगारे पश्चिमचे अध्यक्ष गणेश गायकवाड कल्याण पूर्वचे अध्यक्ष बाबुशेठ तलाठी ,पश्चिमचे अध्यक्ष संतोषजी गायकवाड, तसेच कल्याण पूर्व महिला आघाडी अध्यक्ष ललिता ताई आखाडे अस्मिताताई सरोदे कल्याण ग्रामीण अध्यक्ष रतन जाधव , खडवली जिल्हा परिषद गट अध्यक्ष आप्पा खैरनार, खडवली महिला अध्यक्षा प्रियाताई जगताप व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे इतर पदाधिकारी युवा आघाडी, महिला आघाडी व सम्यक विद्यार्थी आंदोलन मोठ्या संख्येने उपस्थित होते