नेशन न्यूज मराठी टीम.
औरंगाबाद/प्रतिनिधी – वंचित बहुजन आघाडी गंगापूर तालुका कमिटीच्या वतीने तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. रेखाताई ठाकुर प्रदेशाध्यक्षा यांच्या मार्गदर्शनाखाली,वंचित बहुजन महिला आघाडी प्रदेश महासचिव तथा औरंगाबाद जिल्हा प्रभारी अरुंधतीताई शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली, मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील यांच्या आदेशाने शेतकऱ्यांच्या कापसाला किमान १२ हजार रुपये हमीभाव द्यावा, घरगुती वीज बिलात करण्यात आलेली अतिरिक्त छुपी वाढ रद्द करण्यात यावी,व स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमती कमी कराव्यात या विविध मागण्यासाठी तहसील कार्यालय गंगापूर येथे धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी तहसीलदार सतीश सोनी यांना शिष्टमंडळाने भेटुन निवेदन दिले. या आंदोलनात जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद गाडेकर, जेष्ठ नेते माणीकराव करवंजे, दिनेश साळवे,तालुकाध्यक्ष शेख युनुस रज्जाक पटेल,तालुका महासचिव बाबासाहेब दुशिग, महिला आघाडीच्या जिल्हा महासचिव सुनयना मगर, महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा रत्नमाला पवार, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा जयाताई सदावर्ते,शातावन उबाळे, संदिप गायकवाड, कारभारी पाटील गोलांडे, युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष नितीन शेजवळ, संतोष जाधव,हानिफ पटेल, संतोष जमधडे, अमृतराव डोगरदिवे,अमित ठाकुर, सविता हिवाळे,बाळु पारखे, किरण किर्तीशाही, शेख सोहेल,किशोर बनकर, रामेश्वर दाणे, ज्योती मंजुळे, भाऊसाहेब गायकवाड, योगेश संकपाळ, विशाल पठारे,सरला जाधव,, सचिन भुजंग,करण बनकर,पवन साळवे,गोवीद शेलार, अमोल शेजवळ, दिलीप गायकवाड, आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते.