नेशन न्यूज मराठी टीम.
भुसावळ/प्रतिनिधी – केंद्र सरकारने घरगुती गॅसची किंमत ५० रुपये आणि व्यावसायिक गॅसची किंमत ३५० रुपये वाढवल्याने आता १४ किलो घरगुती गॅसची किंमत ११०३ रुपये झाली आहे तर १९ किलो व्यावसायिक गॅसची किंमत २११९ रुपये इतकी झाली आहे. या दरवाढीमुळे सामान्य नागरिकांचे महागाई मुळे कंबरडे मोडले आहे.गॅस सिलिंडरची दरवाढ मागे घ्यावी याकरिता वंचित बहुजन आघाडीतर्फे घंटानाद व चुलीवर चहा करत केंद्र सरकारचा निषेध आंदोलन पार पडले.
प्रांताधिकारी कार्यालय,भुसावळ येथे दिनांक 9 मार्च 2023 रोजी केंद्र सरकारने गॅस सिलिंडरच्या किंमतीत भरमसाठ वाढ केल्याने सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. महागाईमुळे जनता होरपळून निघत असून भाजप सरकारचे धोरण जनसामान्यांच्या विरोधात आहेत. केंद्र सरकारने केलेली गॅस सिलिंडरची दरवाढ मागे घ्यावी, या मागणीसाठी जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांच्या नेतृत्वामध्ये व जिल्हा महासचिव दिनेश इखारे,महिला आघाडी जिल्हाध्यक्षा वंदना सोनवणे,माथाडी कामगार युनियन जिल्हाध्यक्ष बालाजी पठाडे याची उपस्थिती होती गॅस दरवाढीच्या विरोधात मातीच्या चुलीवर चहा करुन केंद्र सरकारचा निषेध केला.
या दरवाढीच्या यावेळी विनोद सोनवणे, समाधान महाजन, शिवसेना जिल्हाध्यक्ष, दिनेश इखारे, वंदना अ सोनवणे, बालाजी पठाडेमीरा वानखेडे, बाळा पवार, गणेश इंगळे,गणेश जाधव, देवदत्त मकासरे मेजर ,कुणाल सुरडकर,छाया हिरोळे, भारती इंगळे,शेख मिसा ,ज्योती गांधी, शोभा तायडे ,शैला तायडे, सुमनबाई सुरवाडे ,संगीता बिऱ्हाडे,ज्युयुरिया परविन,रिना कदम, शिवसेना उ बा ठा पाठींबा दिला. समाधान महजन, संतोष सोनवणे, निलेश महाजन बबलू बरहाटे, दिपक धांडे, हेमंत खंबायत, गोकुळ बाविस्कर राजु इंगळे, सोनी ठाकुर, पींटु भोई, शरद जोहरे, सोनी ठाकुरसंजय खडसे आदी उपस्थित होते.