महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
राजकीय

अकोल्यात मणिपूर हिंसाचाराविरोधात वंचितचा निषेध मोर्चा

नेशन न्यूज मराठी टीम.

अकोला/प्रतिनिधी – वंचित बहुजन आघाडीच्यावतीने मणिपूर हिंसाचाराविरोधात अकोला जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे जिल्हा महासचिव मिलींद इंगळे महिला जिल्हाध्यक्ष प्रभाताई शिरसाट युवा जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. तर या निवेदनात खालील प्रमाणे मागणी करण्यात आली आहे.

मणिपूर मधील ‘कुकी’ या आदिवासी जमातीच्या महिलेवर झालेल्या अत्याचाराचा वंचित बहुजन महिला आघाडी निषेध करीत आहे. मणिपूर येथे ‘मैतेई’ आणि ‘कुकी’ व ‘नागा’ व इतर आदिवासी जमातीमध्ये गेल्या दोन महिन्यापासून संघर्ष सुरू आहे. हा संघर्ष आता दंगल, जाळपोट आणि नरसंहारापर्यंत पोहोचला आहे. हा संघर्ष मैतेई या उच्च जाती जी हिंदू आहे त्यांना कुकी, नागा प्रमाणे आदिवासींचा दर्जा हवा आहे, तर कुकी, नागा व इतर आदिवासी जमाती या मणिपूरच्या डोंगर माथ्यावर राहत आहे.

का अभ्यासकांच्या मते, मणिपूरच्या या पहाडांवर प्रचंड मोठ्या प्रमाणात खनिज संपत्ती दडली असून कुकी व इतर आदिवासी जमातीच्या वास्तव्यामुळे पहाड पोखरून खनिज संपत्ती ताब्यात घेणे कठीण जात आहे. तसेच मैतेई ना ST चा दर्जा नसल्याने ते आदिवासींच्या जमिनी विकत घेऊ शकत नाहीत. परिणामी या सर्व आदिवासी जमातींना तिथून हुसकावून लावण्यासाठी मणीपूर दंगल पेटवली जात असल्याचे वंचित कडून सांगण्यात आले.

दंगलीचा कळस म्हणजे मणिपूर राज्यातील इम्फाळ पासून 35 किलोमीटर अंतरावर असलेल्या गावातील “कुकी” या आदिवासी जमातीच्या दोन महिलांना पोलिसांच्या संरक्षणातून बाहेर काढून मैतेई पुरुषांच्या हिंस जमावाने विवस्त्र करून त्यांच्या नग्न देहाची विटंबना करण्यात आली. या घडलेल्या घटनेचा मागोवा घेतला असता ही घटना 4 मे रोजी पडल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांच्या समक्ष ही घटना घडूनही पोलिसांनी त्यावर कोणतीही अॅक्शन घेतली नाही व FIR सुद्धा दाखल केले नसल्याचे सिद्ध झाले आहे. ही घटना 18 जुलै रोजी सोशल मीडियामुळे व्हायरल झाली तेव्हा FIR दाखल करण्यात आले आहे. कुकी आदिवासी समुदायातील दोन महिलांना विवस्त्र करून फिरवण्यात आले, त्यांच्या देहाची क्रूरपणे विटंबना करण्यात आली. तसेच आरोपींना पकडण्यात पोलिसाची टाळाटाळ यावरून ही घटना राज्य पुरस्कृत असून ही ब्राह्मणी भांडवली धर्मांध शक्तींच्या क्रूरतेचा कळस असल्याचे आम्ही मानत आहोत.

आज दोन महिन्यापासून मणिपूर राज्य जळत आहे. नरसंहार लेकी बाळींची अब्रू घेतल्या जात आहे. मैतई या जातींना पूर्ण संरक्षण देऊन दंगल सुरू ठेवण्याचे कार्य भाजप सरकार करीत आहेत. हेच या घटनेवरून निदर्शनास येत आहे. “बेटी बचाव, बेटी पढाव ” चा ढोल वाजविणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश वाऱ्या करण्यात मशगुल होते. मणिपूरमध्ये वेळीच लक्ष घातले असते, तर देशाला लज्जास्पद आणि लांच्छनास्पद घटना घडली नसती. कुकी महिलांवर झालेल्या अमानवीय अत्याचाराने आम्ही अत्यंत संतप्त झालो आहोत.

भाजपाचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह, अमित शहा यांचा राजीनामा ताबोडतोब घेत आरोपींना शिक्षा द्यावी. तसेच आमच्या मते ही दंगल सरकार पुरस्कृत आहे. मणिपूर मधील कुकी या आदिवासी जमातीच्या महिलांवर झालेला अत्याचार हा अतिशय निंदनीय आहे. असे असुन मणिपूर मधे घडलेल्या घटनेचा व मणिपूर राज्य सरकार व केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने अकोला जिल्हा अकोला जिल्ह्यातील आदिवासी महिला व पुरुषांच्या वतीने मणिपूर मधे घडलेल्या घटनेचा व मणिपूर राज्य सरकार व केंद्र सरकारच्या निषेधार्थ निषेध मार्च काढून अकोला जिल्हाधिकारी मार्फत निवेदन केंद्र सरकारला देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×