नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
मुंबई/प्रतिनिधी – भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. उल्हासनगर येथील हिललाइन पोलीस स्टेशनमध्येच हा प्रकार घडला. या घटनेत महेश गायकवाड जखमी झाले आहेत त्यांना ठाण्यातल्या ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
या प्रकरणारवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करून असे म्हटले आहे की, राजकारणाचा स्तर हा पूर्णपणे घसरला आहे. तुमचे कितीही मतभेद असले, तरी लोकशाहीमध्ये तुम्ही राजे नाहीत. तुम्हाला लोकं राजे बनवतात. तेव्हा मर्यादेत राहून लोकशाहीमध्ये निवडून आलेल्या आमदारांनी स्वतःवर नियंत्रण ठेवावे. अशा मानसिकतेच्या लोकांना जनतेने घरी बसवले पाहिजे, तेव्हाच लोकशाही टिकेल.
राज्यातील पूर्ण प्रशासन कोसळले आहे. अशा घटना पुन्हा घडणार नाहीत, याकडे बघितले पाहिजे. राज्यात असाच ‘गुंडाराज’ होत असेल, तर संबंधित मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे.