नेशन न्यूज मराठी टीम.
रायगड / प्रतिनिधी – मणिपूर राज्यात कुकी या आदिवासी समाजाच्या महिलेची विवस्त्र धिंड काढून केलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्यावतीने रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वंचित बहुजन आघाडीतील नारिशक्ती एकवटली व भाजप विरोधी नारे देत मणिपूरचे मुख्यमंत्री व केंद्रीय गृहमंत्री यांच्या राजीनामाची मागणी मोर्चेकरांच्यावतीने करण्यात आली. शिवाय जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधानांना निवेदन देखील देण्यात आले.
दोन महिन्यापासून मणिपूर राज्य जळत आहे. लेकीच्या बळींची अब्रू घेतल्या जात आहे. एकीकडे ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ चे नारे या देशात सुरू आहेत. मात्र मणिपूरमध्ये वेळीच लक्ष घातले असते तर अशी लज्जास्पद घटना घडली नसती. कुकी महिलावर झालेल्या अमानवीय अत्याचाराने संतप्त झालेल्या वंचित आघाडीच्या वतीने डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जिल्हाधिकाऱी कार्यालय पर्यंत घोषणा देत मोर्चा काढण्यात आला.या मोर्चात वंचित बहुजन आघाडीचे रायगड जिल्ह्या अध्यक्ष यांच्यासह शेकडो कार्यकर्ते व पदाधिकरी उपस्थित होते.