Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
राजकीय

निवडणूक आयोगाच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याचा वंचित बहुजन आघाडी इशारा

नेशन न्यूज मराठी टिम.

https://youtu.be/gFpMiC55k7Y

कल्याण/प्रतिनिधी – ठाणे जिल्हा महिला आघाडी तर्फे कर्मवीर दादासाहेब गायकवाड क्रीडांगण कल्याण येथे भव्य निर्धार सभा आयोजित करण्यात आली होती . या निर्धार सभेच्या उद्घाटक आदरणीय अंजलीताई आंबेडकर व वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ताई ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कल्याण मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या निर्धार सभेत रेखाताई ठाकूर यांनी भाजपवर सडकून टीका केली.

पुणे पोट निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी ही भाजपला मदत करत असल्याची टीका रोहित पवार यांनी केली होती. यावर बोलताना वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी संगितले की ही त्यांची जुनी टीका आहे. भाजपला मदत हे त्यांचे काकाच करतात त्यांनी भाजप सोबत किती युत्या केल्या कसे शपथविधी केल्या आणि आता नागालँड मध्ये हे पुढे आले असताना आमच्या वरती परत तेच आरोप करत राहणार याला काही अर्थ नाही.

हा पॉलिटिकल अजेंडा आहे मात्र वस्तू स्थिती समोर आली आहे. महाविकास आघाडी बरोबर आमचा समझोता नाही आमचा समझोता शिवसेने बरोबर आहे. जागा वाटप विषयी वंचित महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रेखा ठाकूर यांना विचारणा केली असता त्या ही महाविकास आघाडी बरोबर आमचा समझोता झालेला नाही आमचा समझोता हा शिवसेनेबरोबर झालेला आहे आणि त्यामुळे महाविकास आघाडीचे हे जागावाटप आहे. अशी महिती ही रेखा ठाक़ूर यांनी दिली.

महानगरपालिकेच्या निवडणूक बाबत एका ठाकूर यांना विचारले असता पालिकेच्या निवडणुका सातत्याने लांबवल्या जात असून या विरोधात निवडणूक आयोगा विरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला. निवडणूक आयोगाला अशा पद्धतीने वागण्याचा कोणताही अधिकार नाही जर ते संविधानाचे पालन करणार नसतील तर त्यांना आता जनतेने धडा शिकवण्याची गरज आहे आहे. आज चाललेले राजकारण लोकांच्या हिताचे नाही हे त्यांना ठणकावून सांगण्याची गरज आहे म्हणूनच आपण रस्त्यावर उतरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दंगे करायचे भावना भडकवायच्या आणि समाजामध्ये धार्मिक दुर्विकरण घडवून आणायचं आणि त्याच्या आधारावरती निवडणुका जिंकायच्या हे त्यांचं मॉडेल आहे आणि त्या मॉडेल नुसार हा सर्व कार्यक्रम चालू आहे आणि म्हणून आज या ठिकाणी जो काही अक्रोश केला जातो आहे हा आक्रोश या राजकारणासाठी केला जातो आहे त्याच्या मध्ये हिंदूंच्या हिताचा कोणताही विषय नाही तर तो जर असता तर मग त्यांनी या ठिकाणी ओबीसींचे जे आज हिंदू ओबीसींचे राजकीय आरक्षण गेलेला आहे ते आरक्षण वाचवण्यासाठी त्यांनी डेटा दिला असता त्यांच्याकडे असलेला डेटा त्यास द्यायला मागत नाहीत ओबीसी हिंदू नाहीत का? ओबीसी आहेत तुम्ही जर हिंदूंच्यासाठी लढता तर मग हे हेच हिंदू नाहीत का? त्या हिंदूंच्यासाठी तुम्ही काही करणार नाही आणि उगाच या ठिकाणी नको त्या अफ़वा उठवायच्या आणि या ठिकाणी भावना भडकवून लोकांचं रक्त सांडायचं हे जे राजकारण आहे हे राजकारण आम्ही कधीही यशस्वी होऊ देणार नाही अशी टिका ही ठाकुर यांनी विरोधकांवर केली.

मागच्या वेळेस ज्या वेळेस राज ठाकरेंनी हा विषय उठवला होता हनुमान चालीसाचा त्यावेळेस सर्व जिल्ह्यांमध्ये सर्व शहरांमध्ये शांतता मार्च काढून आम्ही त्या ठिकाणी दंगा होऊ देणार नाही भावना भडकवू दिला जाणार नाही चालीसा म्हणायची असेल तर तुम्ही मैदानात म्हणा मशिदीच्या समोर आम्ही म्हणू देणार नाही ही ठाम भूमिका वंचित बहुजन आघाडीने घेतली आणि त्यावेळेस त्यांचं संपूर्ण जो काही अजेंडा होता तो आम्ही फेल केला. असे ही त्यानी संगितले.

आता देखील यापुढे जर का ते या पद्धतीने करणार असतील तर महाराष्ट्र मधल्या वंचित बहुजनांना या ठिकाणी हे सूडबुद्धीचं आणि रक्तपाताचा आणि हिंसेच राजकारणामध्ये वापरता येणार नाही याच्यासाठी आम्ही पुरेपूर काळजी घेऊ.असेही यावेळी त्या म्हणाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
X