नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम.
अहमदनगर/प्रतिनिधी – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात केलेल्या आपत्ती जनक टिपणीनंतर महाराष्ट्र भर वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक होताना दिसून आले आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते प्रा किसन चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आज वंचित बहुजन आघाडी शेवगाव तालुका यांच्यावतीने शेवगाव शहरातील क्रांती चौकामध्ये केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
त्याच्या प्रतिमेची मिरवणूक काढून नंतर शेवगावच्या क्रांती चौकामध्ये येऊन त्यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.