नेशन न्यूज मराठी टिम.
अमरावती/प्रतिनिधी – अमरावती महानगरपालिकावर सध्या प्रशासकीय राजवट आहे. मात्र, या काळात शहरात मोठ्या प्रमाणावर कचरा साचला आहे. कचरा गोळा केला जात नाही. त्यामुळे विविध रोगांची लागण शहरात झाली आहे. तसेच शहरात मोकाट कुत्रे आणि मोकाट जनावरांचा हैदोस सुरू आहे. यासह विविध समस्यांसाठी ठाकरे गटाच्या वतीने पालिकेवर वाजवा रे वाजवा आंदोलन करण्यात आले. यावेळी घाण कचरा लोटगाडीत आणून पालिकेच्या प्रवेशद्वारावर फेकण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणावर आंदोलनकर्ते पोलिसात झटापट झाली. काही काळ तणाव निर्माण झाला होता. यावेळी जोरदार घोषणाबाजी पालिका विरोधात व सरकार विरोधात करण्यात आली आहे.
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने अमरावती महानगरातील नागरिकांना विविध समस्या वरून होणाऱ्या त्रासाबद्दल महानगरपालिकेचे लक्ष वेधण्याकरिता शिवसेना पक्षाकडून शिवसेना महानगरप्रमुख पराग गुडधे यांच्या नेतृत्वात “वाजवा रे वाजवा” आंदोलन महानगरातील समस्यांचे प्रशासनाकडे लक्ष वेधण्यासाठी करण्यात आले. शिवसैनिकांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले कि अमरावती महानगरपालिका क्षेत्रात मागील 6 वर्षांपासून अनेक समस्या उद्भवलेल्या आहेत त्यामध्ये 5 वर्ष भारतीय जनता पक्षाकडे एकहाती सत्ता होती तर एक वर्ष हे प्रशासक राजवटीमध्ये आहे. तरीसुध्दा महापालिकेचे या महानगरावर संपूर्ण दुर्लक्ष आहे याचे कारण कि संपूर्ण महानगरामध्ये प्रभागा प्रभागामध्ये कचऱ्याचा प्रश्न उद्भवलेला आहे. नाल्यांची साफसफाई नाही, पावसाळ्याचे दिवस सुरु असतांना कुठल्याच प्रकारची फवारणी नाही, मोकाट जनावरांचा व मोकाट कुत्र्यांचा हैदोस संपूर्ण महानगरात दिसून येतो.
वरील सर्व विषयांवर महानगरपालिकेने जातीने लक्ष घातले नाही व सर्व मागण्यांचं योग्य निपटारा केला नाही तर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष अमरावती महानगरातील सर्व नागरिकांना व शिवसैनिकांना सोबत घेऊन शिवसेना स्टाईलने भव्य मोर्चा अमरावती महानगरपालिकेवर काढणार असा इशारा शिवसेनेकडून देण्यात आला.