नेशन न्यूज मराठी टिम.
कल्याण/ संघर्ष गांगुर्डे– कल्याण जवळील मंगरूळ गावची पैलवान म्हणून नावारूपास आलेली वैष्णवी दिलीप पाटील सांगली येथील होणाऱ्या पहिल्या महाराष्ट्र केसरी महिला या स्पर्धेमध्ये अंतिम फेरीमध्ये तिने प्रवेश केला आहें. सांगली आणि कल्याणच्या दोन महिला पैलवान यांच्या मध्ये होणारी ही अंतिम लढत होनार आहे. पहिली महाराष्ट्र केसरी कोण होनार या कडे सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
कल्याणची वैष्णवी पाटील जय बजरंग तालीम येथे पंढरीनाथ ढोणे वसंत साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणारी तसेच लहानपणा पासूनच कुस्तीची आवड आणि आतापर्यंत सहा ते सात राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धा गाजवणारी पैलवान आहे. वैष्णवी पाटील महाराष्ट्र केसरीच्या पहिल्याच स्पर्धेमध्ये पोहचली असून तिच्या कामगिरीकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.
वैष्णवी पाटील हिला वडील दिलीप पाटील आणि आई पुष्पा पाटील यांचे कडून पहिल्यापासूनच कुस्ती – पैलवानकीसाठी प्रोत्साहन आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेपर्यंतच मला न थांबता मला आंतरराष्ट्रीय आणि ऑलम्पिक पर्यंत मजल मारायचे आहे व देशच नाव मोठ करायचे आहे. असे वैष्णवीने संगितले।