Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
करियर चर्चेची बातमी

यूपीएससी परीक्षेत नवी मुंबईतील वैशाली कांबळे ने मारली बाजी

नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.

ठाणे/प्रतिनिधी – जगातील सर्वात अवघड परीक्षांपैकी एक यूपीएससी परीक्षा आहे. दरवर्षी लाखोंच्या संख्येने विद्यार्थी ही परीक्षा देतात आणि काही निवडक विद्यार्थीच यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होतात. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या या परीक्षेत नवी मुंबईची वैशाली कांबळे हिने देशभरातून 310 वा क्रमांक पटकावला असून नवी मुंबईतून उत्तीर्ण होणारी ती एकमेव आहे. वैशाली ने आपल्या जिद्दीवर आणि अथक परिश्रम करून हे यश संपादन केले आहे.

देशभरातून लाखोंच्या संख्येने केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये वैशाली हीने ही कामगिरी केल्याने नवी मुंबईसह राज्याचे नाव उंचावले आहे. आई वडील आणि घरातल्यांच्या सहकार्याने आपण हे यश मिळविले असे वैशालीने सांगितले. निकाल समजल्यावर वैशाली आणि तिच्या घरातील सर्वांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू होते. या यशाने आपल्याला देशसेवा करण्याची संधी मिळणार असून आनंद आणि समाधान मिळत असल्याची भावना वैशालीने व्यक्त केली.

Translate »
X