महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image आरोग्य मुख्य बातम्या

केडीएमसी क्षेत्रात ४५ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण सुरु

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका कार्यक्षेत्रात १ एप्रिल पासून ४५ वर्षे व त्यावरील सर्व नागरिकांचे कोविड-१९ आजारापासून बचावाकरीता लसीकरण करण्याची मोहिम सुरु झाली आहे.

महापालिका कार्यक्षेत्रात शास्त्रीनगर रुग्णालय डोंबिवली प., बाई रुक्मिणीबाई रुग्णालय कल्याण प., सावळाराम क्रिडा संकूल डोंबिवली पू., विभागीय रेल्वे रुग्णालय कल्याण पू., प्रबोधनकार ठाकरे शाळा, नेतिवली कल्याण पू., आर्ट गॅलरी लालचौकी कल्याण प. या  ६ शासकीय लसीकरण केंद्रावर कोविडची लस मोफत दिली जात आहे.

तर आर आर हॉस्पीटल डोंबिवली पू., एम्स रुग्णालय डोंबिवली पू., श्री महागणपती हॉस्पीटल टिटवाळा पू., इशा नेत्रालय कल्याण प., स्टारसिटी मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल कल्याण पू., नोबेल हॉस्पीटल डोंबिवली पू., ऑप्टीलाइफ मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल डोंबिवली पू., सिध्दीविनायक मल्टीस्पेशालिटी ॲन्ड कार्रडियाक केअर सेंटर कल्याण प., एसआरव्ही ममता हॉस्पीटल डोंबिवली पू., होलीक्रॉस हॉस्पीटल कल्याण प., श्वास मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल कल्याण प., डॉ.सी.बी वैदय मेमोरीयल हॉस्पीटल कल्याण प.या  १२ खाजगी रुग्णालयांमध्ये प्रती डोस २५० रुपये इतके शुल्क आकारुन ही लस घेण्याची सुविधा उपलब्ध आहे.

४५ वर्षावरील नागरिकांबरोबरच ज्येष्ठ नागरिक, आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन कर्मचारी यांचे देखील लसीकरण वरील सर्व केंद्रावर सुरु आहे. आरोग्य विभागामार्फत लसीकरणासाठी पात्र सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये, आरोग्य सेतु अथवा Cowin.gov.in या संकेत स्थळावर लसीकरण नोंदणी करुन लसीकरणासाठी यावे, मास्क तसेच सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करावे. सर्व पात्र नागरिकांना लवकरात लवकर कोविड लसीकरण सुविधांचा लाभ देण्यासाठी महानगरपालिकेमार्फत प्रयत्न केले जात असून लसीच्या उपलब्धतेनुसार महानगरपालिका कार्यक्षेत्रात टप्‍प्याटप्‍प्याने लसीकरण केंद्राची संख्या वाढविण्यात येणार आहे.

कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस ६ आठवडयानंतर घेतल्यास अधिक परिणामकारक, रोगप्रतिकारक शक्ति प्राप्त होत असल्याचे निदर्शनास आल्याचे शासनाकडून प्राप्त झालेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार कळविण्यात आलेले आहे,त्यानुसार महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत कोविशिल्ड लसीचा प्रथम डोस घेतलेल्या सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अधिक परिणामकारक रोगप्रतिकारक क्षमता साधण्यासाठी या नागरिकांनी कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस, प्रथम डोस प्राप्त केल्यानंतर ६  आठवडयानंतर घेण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×