नेशन न्यूज मराठी टिम.
कल्याण/प्रतिनिधी – कल्याण डोंबिवलीतील खराब रस्ते हा तर संपूर्ण देशभर चर्चेचा विषय बनला आहे. नागरिक निवेदने देऊन थकले, आंदोलने करुन थकले त्याच बरोबर सोशल मीडियावर खराब रस्त्याची वेगवेगळ्या पद्धतिने व्हिडीओ रिल बनविण्यात आले जोक्स तयार करण्यात आले. त्यातच रस्त्याच्या खड्ड्यामुळे अनेक नागरिक जायबंदी झालेत काहींनी तर आपला जीव देखिल गमावला आहे, पण झोपेचे सोंग घेतलेल्या प्रशासनाला जाग येताना दिसत नाही.यामुळे आमदार राजू पाटील यांनी आपल्या मनसे शैलीत सरकारचा चांगलाच समाचार घेतला आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे आज कल्याण शीळ रोडची पाहणी करण्यासाठी येणार होते. मात्र त्यांचा हा दौरा रद्द झाला. यावर मनसे आमदार राजू पाटील यांनी अप्रत्यक्षरीत्या खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका केली. आमदार पाटील यांनी इथे सीएम डीसीएम मंत्री संत्री सगळं एकच माणूस आहे. इथे बाकी कुणी येणार नाही. आमच्या इथे ना पालकमंत्री येत आहेत, असे दौरे करायला. ना दुसरं कोणी. सगळं वाऱ्यावर सोडलं आहे. कल्याण लोकसभा पूर्णपणे वाऱ्यावर सोडली आहे. इथे कोणी वाली नाही, अशी टीका अप्रत्यक्ष रित्या खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर त्यांनी केली आहे.त्याच बरोबर नुसती रस्त्याची कामे काढणे म्हणजे विकास नाही असे खडेबोल सरकार व मंत्र्याना सुनावले आहे. काम ही पध्दतशीर पण झाली पाहिजे असा सल्ला ही यावेळी त्यानी दिला आहे.
कल्याण शीळ रोड अद्याप पूर्ण झालेला नाही. एमआयडीसीत रस्ते होतात. त्याचा समन्वय केडीएमसीशी नाही. केडीएमसीचा एमएमआरडीएशी समन्वय नाही, इथे फक्त टक्के वारी काढण्यासाठी कामे होत आहे. विकास होत नाही. प्रामाणिक पणे कुणी कामे करताना दिसत नाही, अशी टीका मनसे आमदार राजू पाटील यांनी केली. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात सुरु असलेल्या विकासकामावरून आमदार पाटील यांनी सत्ताधाऱ्यांसह संबंधित यंत्रणाना लक्ष्य केलं
भाजपचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी काल पत्राच्या माध्यमातून मनसेला लक्ष्य केला होतं. मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या टीकेला आज मनसे आमदार राजू पाटील यांनी खरमरीत उत्तर दिले.आमदार राजू पाटील यांनी आमचा पक्ष खळखट्याक करणारा पक्ष आहे. आम्ही तोडफोड करूनच ६५ च्या आसपास टोलनाके बंद केलेत. यांना आंदोलन केलेले कळत नाही. टोलनाका फोडल्यावर एवढं कोणाचं काय कामात व्यत्यय येईल, असं काही नाही. जेसीबी फुटला ते आम्ही मान्य केलं. मात्र हेतू वाईट नाही. गणपतीमध्ये एक लाईन बनवणार याबद्दल त्यांचे स्वागत आहे. मात्र हा रस्ता टिकला पाहिजे.
ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री बदला, अशी मागणी मनसे आमदार राजू यांनी केली होती. याबाबत बोलताना राजू पाटील यांनी पालकमंत्र्यांशी माझं वैयक्तिक काही वाद नाही. ते खूप चांगली व्यक्ती आहेत. मात्र साताऱ्यावरून इथे यायला त्यांना वेळ मिळत नाही. तीन-चार वेळा बैठकी रद्द होतात. एका डीपीडीसीच्या बैठकीत काही मुद्दे मांडले असतील, त्याचे उत्तर विचारायला पालकमंत्र्यांचं पुन्हा येणं होत नाही. त्यामुळे जिल्ह्यात एखादं मंत्रीपद द्या व त्यांना पालक मंत्री करा, असं ते म्हणाले.त्यामुळे येणाऱ्या पालिका निवडणुका सेना मनसे मध्ये कलगीतुरा रंगणार यात तिळमात्र शंका नाही
चांद्रयानाची पायाभरणी ही देश स्वतंत्र झाल्यापासून सुरु आहे त्यामुळे कोणी एकाने याचे श्रय घेऊ नये हे सर्व भारतीय शास्रज्ञ यांच्यामुळे शक्य झाले आहे.असेही ते म्हणाले