नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई/प्रतिनिधी – देशातील पहिले आधार कार्ड 29 सप्टेंबर 2010 रोजी रंजना सोनवणे यांचे बनले होते. रंजना या महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील टेंभली येथील रहिवासी आहेत. महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील टेंभली गावातून आधार कार्ड बनवण्याची सुरुवात झाली. आज भारतात मोठ्या संख्येने लोकांकडे त्यांचे आधार कार्ड आहे. शासनाच्या अनेक लोककल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आपल्या सर्वांना याची गरज आहे.
आधार कार्ड आणि त्यासंबंधी होणारी फसवणूक टाळण्यासाठी भारत सरकारच्या माहिती तंत्रज्ञान विभागानं नागरिकांना आधार अपडेट करण्याचं आवाहन केलं आहे. तुमचं आधार कार्ड 10 वर्षांपेक्षा जुनं असेल आणि याआधी कधी ते अपडेट केलं नसेल, तर ते ताबडतोब अपडेट करुन घेण्याचा सल्ला आधार म्हणजेच यूनिक आयडेंटिफिकेशन ऑथॅरिटी ऑफ इंडियानंही दिला आहे. याविषयी स्पष्ट सूचना ‘आधार’ च्या वेबसाईटवर देण्यात आली आहे. आधार अपडेट केल्यास ते वापण्यास सुलभता येईल आणि त्यामुळे अचूकता वाढेल, असं या सूचनेत म्हटलं आहे.
तुम्ही तुमचं आधार कार्ड तुमच्या भागातील आधार केंद्रावर जाऊन अपडेट करू शकता किंवा ऑनलाईनही ते अपडेट करता येईल. आधार कार्डवरील कोणती माहिती ऑनलाईन पद्धतीनं अपडेट किंवा दुरुस्त करता येते याचीच माहिती आता जाणून घेऊया.
आधार कार्ड ऑनलाईन अपडेट करण्यासाठी https://myaadhaar.uidai.gov.in या वेबसाईटवर जायचं आहे. इथं लॉग इन (Log in) पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, पुढे केपचा (Captcha) टाकून सेंड ओटीपी पर्यायावर क्लिक करायचं आहे. यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एक एटापासून (OTP) पाठवला जाईल. तो इथं तुम्हाला टाकायचा आहे. मग लॉग इन (Log in) वर क्लिक करायचं आहे.
पुढे माय आधार (‘My Aadhar’) नावाचं एक नवीन पेज ओपन होईल. इथं वेगवेगळ्या सेवांची यादी तुम्हाला दिसेल. त्यातील आॉनलाईन अपडेट सर्व्हिस (‘Online Update Services’ ) या रकान्यावर क्लिक करायचं आहे. एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल. इथल्या अपडेट आधार ऑनलाईन (‘Update Aadhar Online’) या रकान्यात क्लिक करायचं आहे. आता पुन्हा एक नवीन पेज ओपन होईल. इथं आधार अपडेट कसं होतं, त्याची सविस्तर प्रक्रिया 9 मुद्द्यांमध्ये सांगितलेली असेल. uidai या पोर्टलवरून तुम्ही तुमचं नाव, जन्मतारिख, लिंग आणि पत्ता अपडेट करू शकता, अशी सूचना पहिल्याच मुद्द्यात दिलेली असेल.
पण, तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर, ई-मेल आणि बायोमेट्रिक डेटा अपडेट करायचा असेल तर मात्र जवळच्या आधार सेवा केंद्रावर जावं लागेल. आधार अपडेट करण्यासाठी 50 रुपये शुल्क लागेल, त्यानंतर तुम्हाला एक सर्व्हिस रिक्वेस्ट नंबर (Service Request Number) दिला जाईल, ज्याचा वापर करून तुम्ही अपडेटचं स्टेटस पाहू शकाल. 30 दिवसांत ही प्रक्रिया पार पडेल आणि एसएमएसद्वारे तुम्हाला तसं कळवलं जाईल, अशा सूचना इथं असतील.
पुढे तुम्हाला प्रोसीड टू अपडेट आधार ‘Proceed to Update Aadhar’ या पर्यायावर क्लिक कराचयं आहे. त्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल. तिथं तुम्हाला नाव, जन्मतारिख, लिंग आणि पत्ता यापैकी जे काही अपडेट करायचं आहे, तो एक पर्याय निवडायचा आहे. समजा मला पत्ता अपडेट करायची असल्यास ॲडरेस (address) या रकान्यावर क्लिक केलं आहे. त्यानंतर प्रोसीड टू अपडेट आधार ( ‘Proceed to Update Aadhar’ ) या पर्यायावर क्लिक करायचं आहे. तिथे Current Details रकान्यात तुम्हाला तुमचा आधीचा पत्ता दिसेल, डिटेल्स टू बी अपडेटेड (Details to be Updated ) या रकान्यात जी माहिती अपडेट करायची आहे तुम्हाला ती भरायची आहे. सुरुवातीला इंग्रजी आणि मग मराठीत नाव टाकायचं आहे. एरिया (Area) या रकान्यात गावाचं, तालुक्याचं आणि जिल्ह्याचं नाव टाकायचं आहे. हीच माहिती खालच्या रकान्यात मराठीत टाकायची आहे. पुढे पीन कोड (Pin Code) टाकला की राज्य आणि जिल्ह्याचं नाव तिथं आपोआप येतं. पुढे तुम्हाला तुमच्या गावाचं नाव (Village) आणि पोस्ट ऑफिसचं (Post Office) नाव निवडायचं आहे.
सिलेक्ट व्हॅलिड सपोर्टिंग डॉक्युमेंट टाईप (Select Valid Supporting Document Type) या रकान्यामध्ये दिलेल्या कागदपत्रांपैकी एक कागपदत्र निवडायचं आहे. त्यानंतर व्ह्युव डिटेल्स ॲंन्ड अपलोड डॉक्युमेंट्स (View details and upload documents )वर क्लिक करायचं आहे. त्यानंतर स्क्रीनवर एक सूचना येईल, ती वाचून कंटीन्यु टू अपलोड (continue to upload ) वर क्लिक करायचं आहे. हे डाक्यूमेंट अपलोड झालं की नेक्स्ट (next) वर क्लिक करायचं आहे.इथं तुम्हाला तुम्ही अपडेट केलेला डेटा दिसून येईल. तो वाचून खाली असलेल्या दोन्ही पर्यायावर तुम्हाला टिक करून नेक्स्ट ( next) वर क्लिक करायचं आहे.पुढे तुम्हाला 50 रुपये एवढं पेमेंट करायचं आहे. इथल्या सूचनेवर टिक करायचं आहे आणि मग मेक पेमेंट (make payment) वर क्लिक करायचं आहे. डेबिट किंवा क्रेडिट कार्ड, यूपीआय, नेटबँकिंग, पेटीएम, व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्ही हे पेमेंट करू शकता.
पेमेंट केलं की ते सक्सेस झाल्याची सूचना स्क्रीनवर दिसेल. येथील download acknowledgement वर क्लिक केलं की तुम्हाला पेमेंट केल्याची पावती पीडीएफमध्ये डाऊनलोड होऊन मिळेल. या पावतीवर तुमची आधीची माहिती आणि अपडेट करून काय हवंय, तेही नमूद केलेलं असेल. आधारच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या 30 दिवसांत तुमचं आधार कार्ड अपडेट होईल. त्यानंतर आधार लेटर तुमच्या पत्त्यावर पाठवून दिलं जाईल.
Related Posts
-
नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी, शासकीय योजनांच्या लाभासाठी आधार कार्ड लिंक करा
मुंबई - राज्य शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता…
-
दहा वर्षांपूर्वी जारी झालेल्या आधार कार्ड धारकांनी आपली कागदपत्रे अद्ययावत करावी -युआयडीएआयचे आवाहन
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - ज्या राहिवाशांना दहा…
-
आंतरराष्ट्रीय युवा दिना’निमित्त विशेष पोस्ट कार्ड
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. पणजी - "आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त, विशेष…
-
बीएसएनएलच्या १५ आधार सर्व्हिस सेंटरचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली- केंद्र सरकारने मेक इन इंडिया…
-
परदेशी नोकरीचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक
नेशन न्यूज़ मराठी टिम. नवी मुंबई/प्रतिनिधी- बाहेरच्या देशात नोकरीसाठी पाठवणार…
-
मराठवाड्यात नवजात बालकांचा आधार ठरणार मानवी मिल्क बँक
नेशन न्यूज मराठी टीम. संभाजीनगर / प्रतिनिधी -बदलत्या जीवनशैलीचा परिणाम…
-
ओळखपत्राचा पुरावा म्हणून आधार स्वीकारण्यापूर्वी त्याची पडताळणी करा- युआयडीएआय
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - एखाद्या व्यक्तीची ओळख…
-
शिधापत्रिकाधारकांच्या आधार संलग्नीकरणात यवतमाळ जिल्हाने मारली बाजी
नेशन न्यूज मराठी टीम. यवतमाळ/प्रतिनिधी - अन्नधान्य वितरणातील अपहार, गैरव्यवहार…
-
फसवणूक करणाऱ्या पती-पत्नीला कोळसेवाडी पोलिसांकडून अटक
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - कल्याण पूर्व…
-
जीएसटी चुकवून फसवणूक करणाऱ्याला अटक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र वस्तू व सेवाकर…
-
मुंबईतील आधार संरक्षण भिंतींच्या प्रश्नी वंचितची आमरण उपोषणाची हाक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - मुंबईत डोंगर उतारावरील असलेल्या…
-
डोंबिवलीत सिम कार्ड फ्रॉड प्रकरणी महिलालेला अटक
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - डोंबिवली स्टेशन परिसरात दुकानाचे…
-
माय माऊलीच्या जन्माचा उत्सव अनवणी पायांना आधार देऊन केला साजरा
सोलापूर/प्रतिनिधी - सोलापूर शहर पोलीस शिपाई शांतीसागर जेनुरे यांनी आपल्या…
-
ऑनलाईन सेवांसाठी आधार नोंदणीकृत मोबाईल नंबर अपडेट करणे आवश्यक
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - ऑनलाईन…
-
अलका सावली प्रतिष्ठानतर्फे श्रम कार्ड वितरण उपक्रमाला सुरवात
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - असंघटित क्षेत्रातील कामगार आणि मजुरांसाठी सुरू केलेल्या श्रम कार्ड…
-
नवी मुंबई पोलिसांच्या वतीने सायबर गुन्हे टाळण्यासाठी जनजागृती
नेशन न्यूज़ मराठी टिम. नवी मुंबई/प्रतिनिधी - सायबर गुन्हे टाळण्यासाठी…
-
कोट्यावधीची फसवणूक करणाऱ्या कंपनीचा मोरक्या पोलिसांच्या जाळ्यात
नेशन न्यूज मराठी टीम. सांगली / प्रतिनिधी - गुंतवणूकदारांची सुमारे…
-
कोकण हापूस आंब्याच्या नावाने फसवणूक करणाऱ्यावर कारवाई होणार
मुंबई प्रतिनिधी- आंबा हा शेतमाल ज्या राज्यातून व ज्या नावाने त्याची…
-
सत्ताधाऱ्यांकडूनच धनगर समाजाची फसवणूक- ॲड. प्रकाश आंबेडकर
पंढरपूर प्रतिनिधी - आरक्षणाच्या नावाखाली काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप या…
-
बनावट पावत्या देत विज ग्राहकांची फसवणूक, भामटा गजाआड
कल्याण प्रतिनिधी- वीजबिल भरल्याची बनावट पावती देऊन रक्कम परस्पर हडपून…
-
द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक करणारे ३ जण पोलिसांच्या ताब्यात
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक / प्रतिनिधी - निफाड तालुक्यातील…
-
नवी मुंबईतील वृद्ध जोडप्यासोबत ३२ लाखांची ऑनलाईन फसवणूक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - देशात आर्थिक…
-
लाईट बिल भरण्याच्या नावाखाली आजोबांची ऑनलाईन फसवणूक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - लोकांची ऑनलाईन फसवणूक…
-
चोरीच्या मीटरमधून वीजचोरी,फसवणूक व वीजचोरीचा गुन्हा दाखल
पालघर/प्रतिनिधी - व्यावसायिक गाळ्याबाहेर लावलेले वीजमीटर चोरून त्याचा वापर निवासी…
-
गणेश विसर्जन मार्गात संभाव्य कोंडी टाळण्यासाठी नवी मुंबईत वाहतुकीत बदल
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी - गणेशोत्सव…
-
राज्यात एक देश एक रेशन कार्ड योजनेची प्रभावी अंमलबजावणी
मुंबई प्रतिनिधी - सर्वसाधारणपणे राज्यात दरमहा सात लाख शिधापत्रिकांवर जिल्हांतर्गत…
-
आता मतदार कार्ड होणार 'आधार' शी लिंक, १ ऑगस्टपासून विशेष मोहिम
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे - भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार…
-
ग्राहकांची फसवणूक करून फरार झालेल्या ज्वेलर्सला राजस्थान मधून अटक
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - सोन्याचे दागिने घेऊन…
-
एसबीआयची ८० कोटी रुपयांची फसवणूक, सीबीआयचे खासगी कंपनीवर छापे
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - भारतीय स्टेट बँकेच्या मुंबई…
-
नाफेडची कांदा खरेदी बंद केल्याने कांदा उत्पादकांची सरकार कडून फसवणूक - जयंत पाटील
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक/प्रतिनिधी - कांदा बाजार भाव प्रश्नी…
-
पोलीस भरतीचे आमिष दाखवून केली फसवणूक, भामटा गजाआड
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. https://youtu.be/_xHS5588DfE?si=0atlIj7pm6fExccJ कल्याण/प्रतिनिधी - पोलीस भरतीचे…
-
देवासाठी नोटा हव्याअसल्याचे सांगून ३९ हजारांची फसवणूक,फरार भामटे सीसीटीव्हीत कैद
डोंबिवली - देवाच्या कामासाठी सीएल सिरीयल नंबर असलेल्या नोटा पाहिजेत…
-
पोलीस असल्याची बतावणी करून मुलीची केली फसवणूक,पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/OMA7OGzyJ2E पंढरपूर- पंढरपूर तालुक्यात एका मुलीला…
-
महावितरण व वीज ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला एक वर्षाचा कारावासाची शिक्षा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - वीजबिल कमी करण्याचे आमिष…
-
अपघात टाळण्यासाठी पावसात वीज यंत्रणेपासून सतर्क राहण्याचे महावितरणचे आवाहन
नेशन न्यूज़ मराठी टिम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे- वादळी व संततधार पाऊस…
-
१९ कोटी रुपयांच्या आयकर फसवणूक प्रकरणी ओपो मोबाईल कंपनीच्या वित्तीय व्यवस्थापकाला अटक
नेशन न्यूज मराठी टीम. भिवंडी/प्रतिनिधी - मेसर्स ओपो (OPPO) मोबाईल्स…
-
तरुणांशी गरिबीच्या नावाने लग्न करून फसवणूक करणाऱ्या तीन महिला गजाआड
भिवंडी/ प्रतिनिधी -फसवणुकीचा अनेक घटना आपल्या आजूबाजूला नेहमीच घडत असतात…
-
नॅशनल कॉमन मोबॅलिटी कार्ड हे रेल्वेसाठी ही वापरले जावे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची केंद्राकडे मागणी
नेशन न्युज मराठी टिम. नवी दिल्ली - नॅशनल कॉमन…
-
भारतातील पहिल्या बेस्टच्या एनसीएमसी-कार्ड सुविधेचे लोकार्पण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - आम्ही जे करतो ते…
-
साडे दहा कोटींची बँकेची फसवणूक,मुख्य व्यवस्थापक जोशी यांना २ वर्षांच्या कारावासासह चार लाखाचा दंड
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - सीबीआय प्रकरणांसाठी मुंबईच्या…
-
खरीप हंगामात किसान क्रेडिट कार्ड (KCC) द्वारे बँकांनी पीक कर्ज वाटप करण्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आवाहन
प्रतिनिधी. बीड - कोरोना संसर्गाचे पार्श्वभूमीवर राष्ट्रीयकृत, जिल्हा मध्यवर्ती सहकारी…