नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.
भंडारा/प्रतिनिधी – हवामान खात्याकडून वर्तविण्यात आलेल्या अंदाजानुसार भंडारा-गोंदिया जिल्ह्यात मागील तीन ते चार दिवसांपासून अवकाळी पावसाचे संकट ओढवले आहे. सातत्यानं वातावरणात बदल होत आहे. याचा शेती पिकांना मात्र मोठा फटका बसत आहे. दिवसभर ऊन तापल्यानंतर सायंकाळच्या सुमारास वातावरणात बदल होऊन वादळाला सुरुवात होते.
भंडारा-गोंदिया जिल्ह्यात हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार रात्री 11 वाजेच्या सुमारास जोरदार वादळ वाऱ्यासह, विजांचा कडकडाटासह पावसाला सुरवात झाली. अनेक ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या. यावेळी अनेक भागात विज पुरवठा खंडीत झाला. या अवकाळी पावसामुळे गेल्या अनेक दिवसांपासून उन्हाच्या झळा सहन करणाऱ्या नागरिकांना उन्हापासून दिलासा मिळत होता. मात्र, शेतकऱ्यांच्या फळबाग,भाजीपाल्याचे या अवकाळी पावसामुळे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या आधीही भंडारा-गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडला होता.