महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image पोलिस टाइम्स मुख्य बातम्या

डोंबिवलीत ज्वेलर्स मालकावर अज्ञाताकडून हल्ला; घटना सीसीटीव्हीत कैद,पोलिसांकडून शोध सुरु

नेशन न्यूज मराठी टीम.

डोंबिवली – डोंबिवलीतील पूर्वेतील आगरकर रोडवर असणाऱ्या ज्वेलर्स दुकानात घुसून थेट दुकान मालकावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात दुकान मालक जखमी झाले असून हा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. तर या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनीही या अज्ञात हल्लेखोराचा शोध सुरू केला आहे.

डोंबिवली पूर्वेच्या आगरकर रोडवर मन्ना गोल्ड नावाचे दुकान असून दुकानाचे मालक तारकनाथ मन्ना (54 वर्षे) हे दुकानात बसले होते. त्यावेळी दुपारच्या सुमारास दुकानात एक अनोळखी व्यक्ती आली आणि त्याने थेट मन्ना यांच्यावर चाकूच्या साहाय्याने हल्ला चढवला.
आणि मन्ना यांना काही समजायच्या आतच त्याने तिथून धूम ठोकली.
दरम्यान या हल्लेखोराने दुकानातील कोणतीही वस्तू न नेल्याने आश्चर्य व्यक्त होत असून कदाचित पूर्व वैमनस्यातून हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.

याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी हल्लेखोराचा शोध सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×