महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image लोकप्रिय बातम्या व्हिडिओ

कल्याणातील अवलियाकडून नववर्षाचे अनोखे स्वागत, २० वर्षांत सायकलवरून तब्बल १०० किल्ल्यांवर चढाई

प्रतिनिधी.

कल्याण – थर्टीफर्स्ट अर्थातच नववर्ष म्हटलं की डोळ्यासमोर येतात त्या जंगी पार्ट्या, नयनरम्य रोषणाई, फटाक्यांची आतिषबाजी. गेल्या काही वर्षांत नविन वर्षाच्या सेलिब्रेशनचा हा जणू काही अघोषित नियमच झाला आहे. मात्र या क्षणभंगुर आणि भौतिक देखाव्यात न रमता कल्याणातील एक अवलियाने नववर्ष स्वागताचा असा अनोखा पायंडा पाडला आहे ज्याचं करावे तेवढे कौतुक कमीच ठरेल.

सुशांत करंदीकर असं या अवलियाचे नाव असून त्यांनी नववर्षानिमित्त 2001 पासून गेल्या 20 वर्षांमध्ये महाराष्ट्रातील थोडे थोडके नव्हे तर तब्बल 100 अवघड किल्ले सर केले आहेत आणि तेही सायकलवरून. सह्याद्री सायकल मोहिमेंतर्गत सुशांत यांनी सायकल घेऊन महाराष्ट्रातील विविध किल्ल्यांचा माथा गाठला आणि नववर्षाचे अत्यंत वेगळ्या पद्धतीने स्वागत केले. यंदाच्या नववर्षाचे स्वागत स्वराज्याची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रायगडासह घोसाळगड, तळागड, मानगडावर करण्यात आले. विशेष म्हणजे सह्याद्री सायकल मोहिमेतील हा 100 वा किल्ला होता. ज्यामध्ये सुशांत करंदीकर यांच्यासह कृष्णा नाईक (47 वर्षे), दीपाली कंपाली (45वर्षे) , दिवाकर भाटवडेकर (40 वर्षे), वरद मराठे (16 वर्षे), चिन्मयी ढवळे (15 वर्षे), मन नाईक (15वर्षे) आणि दैविक कंपाली (11 वर्षे) हेदेखील सहभागी झाले होते. या सर्वांनी तब्बल 290 किलोमीटर सायकल प्रवास करत ही 4 गडकिल्ल्यांची मोहीम पूर्ण करण्यात आल्याचे सुशांत करंदीकर यांनी  बोलताना सांगितले. तर आतापर्यंत सुशांत करंदीकर यांनी राजगड, पन्हाळगड, विशाळगड, कळसुबाई, नाणेघाट, लोहगड, विसापूर, तिकोना अशा अनेक महत्वपूर्ण किल्ल्यांचा समावेश आहे. ज्यामध्ये अनेक छोटेखानी आणि सागरी किल्ल्यांवर सायकलवरून चढाई करण्यात आली आहे.
गेल्या 20 वर्षांपासून सातत्याने ही मोहीम राबविण्यात येत असून विदेशाप्रमाणे आपल्याकडेही ‘माऊंटन बायकिंग’चा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठीही आपण हा खटाटोप करीत असल्याचेही करंदीकर यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान सुशांत करंदीकर यांचा गेल्या 2 दशकांपासून अव्याहतपणे सुरू असणारा हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद असून त्याचा आदर्श इतरांनीही घेण्याची आज खरी गरज आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »