Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
महाराष्ट्र लोकप्रिय बातम्या

मतदान जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम, तयार केली मानवी साखळी

नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.

चंद्रपूर/प्रतिनिधी – तरुणाई ही देशाच्या भविष्याबरोबरच उगवता सूर्य आहे. हाच उगवता सूर्य उद्या देशाला प्रगतीच्या वाटेवर घेऊन जाणार आहे. त्यामुळेच निवडणुकी विषयी तरुणाईने जागरूक राहणे फार महत्वाचे आहे.    

प्रत्येक निवडणुकीत मतदान करून आपला हक्क बजावला पाहिजे. लोकशाही बळकट करण्याबरोबरच मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून निवडणूक आयोगाकडून “सिस्टमॅटिक व्होटर्स एज्युकेशन ऍण्ड इलेक्‍ट्रोरल पारर्टीसिपेशन’ (स्वीप) हा कार्यक्रम राबविण्यात आला. श्री महर्षी विद्या मंदिर येथील विद्यार्थ्यांनी मतदानाची जनजागृती करण्यासाठी ‘मतदान करा’ हे शब्द ड्रोन द्वारे प्रदर्शित करत मानवी साखळी तयार केली होती. या कार्यक्रमात उपस्थित असलेले जिल्हा अधिकारी विनय गौडा म्हणाले की, असे उपक्रम जिल्ह्यात राबविले तर मतदानाची टक्केवारी या माध्यमातून नक्की वाढू शकेल. कारण विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहे. त्यांच्या माध्यमातून ही जनजागृती राबवली तर ते आपल्या आई वडिलांना मतदान नक्की करावे यासाठी ते प्रोत्साहित करतील.

Translate »
X