महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image चर्चेची बातमी ठाणे

उत्सव गणेशाचा,जागर मताधिकाराचा ,गणेशोत्सवात भिवंडी मतदार नोंदणीसाठी अनोखी जनजागृती 

भिवंडी/प्रतिनिधी – भिवंडीत मतदार नोंदणी कार्यक्रम निवडणूक तसेच महसूल विभागाने हाती घेतला आहे . सध्या कोरोना संकट थोडेफार आटोक्यात असल्याने शासकीय नियमांचे पालन करून ठिकठिकाणी गणेशोत्सव साजरा करण्यात येत असल्याने गणेशोत्सवाच्या निमित्ताने भिवंडी महसूल विभागाकडून ” उत्सव गणेशाचा , जागर मताधिकाराचा” अशी अनोखी मतदार जनजागृती मोहीम भिवंडी प्रांताधिकारी बाळासाहेब वाकचौरे यांनी शहरात राबविली आहे . सार्वजनिक गणेशोत्सव व धार्मिक स्थळांबरोबरच ज्या ज्या ठिकणी नागरिकांचे रोजचे येणे जाणे आहे अशा ठिकाणी प्रांताधिकाऱ्यांनी हि जनजागृती मोहीम राबविली असून ठिकठिकाणी मतदार नोंदणी जनजागृतीचे बॅनर लावण्यात आले आहेत. 

 भिवंडीत आगामी महापालिका निवडणुकी साठी सर्वच राजकीय पक्षांनी राजकीय मोर्चे बांधणी सुरु केली आहे . तर दुसरीकडे महसूल व निवडणूक विभागाकडून शहरातील जास्तीत जास्त मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी मतदार नोंदणी करणे गरजेचे आहे . मात्र अनेक वेळा नागरिकांना मतदार नोंदणी करतांना अनेक अडचणी येत असतात त्यामुळे मतदारांचा गोंधळ उडतो ज्याचा फायदा काही राजकीय पुढारी तर कधी मतदार यादीत नाव चढविण्यासाठी दलाल आर्थिक व्यवहार करून मतदारांकडून पैसे उकळण्याचे प्रकार घडत असतात . या सर्व अवैध प्रकारांना आळा बसावा व जास्तीत जास्त नागरिकांनी स्वतः पुढाकार घेऊन आपले मतदार यादीत नाव नोंदविणे शक्य व्हावे म्हणून भिवंडी प्रांताधिकाऱ्यांनी शहरात ठिकठिकाणी तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या ठिकणी ” उत्सव गणेशाचा , जागर मताधिकाराचा अशी अनोखी मतदार जनजागृती मोहीम भिवंडीत सुरु केली असून या मोहिमेस नागरिकांचा प्रतिसाद मिळत असून नागरिकांना किचकट वाटणारी मतदान नोंदणी या मोहिमेतून सुलभ होणार असल्याची भावना दक्ष भिवंडीकर व्यक्त करीत आहेत. 

दरम्यान हि संकल्पना मुंबईत केलेल्या जनजागृतीच्या संकल्पनेतून भिवंडीत राबविली जात असून कोरोना काळात मतदार जनजागृती करता आली नाही त्यामुळे आता सार्वजनिक गणेश मंडळ , धार्मिक स्थळे, मार्केट व जिथे नागरिक जास्त ये जा करतात अशा सर्वच ठिकाणी ‘ उत्सव गणेशाचा , जागर मताधिकाराचा’ हि जनजागृती मोहीम राबवली जात असून तसे बॅनर ठिकठिकाणी लावले असून त्यामुळे लोकांमध्ये निश्चितच जनजागृती होईल व मतदार नोंदणीसाठी जास्तीत जास्त नागरिक स्वतः पुढाकार घेतील अशी प्रतिक्रिया भिवंडीचे प्रांताधिकारी बाळासाहेब वाकचौरे यांनी नेशन न्युज मराठीला  दिली आहे.     

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »