नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण/संघर्ष गांगुर्डे – महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी नंतर सत्तांतर झाले. शिंदे गट आणि भाजप यांचे सरकार स्थापन झाले आहे. त्यातच महाराष्ट्र मध्ये विविध निवडणुकीचे वारे वाहत आहेत. याच पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आपली कंबर कसलेली दिसून येत आहेत. यात भाजप मोठ्या ताकातीनिशी उतरणार आहे असे दिसत आहे . यामुळेमहाराष्ट्रात केंद्रीय मंत्र्यांचे दौरे सुरु आहेत.
महाराष्ट्रातल्या १६ लोकसभा क्षेत्रामध्ये केंद्रीय मंत्री प्रत्येक लोकसभा क्षेत्रात तीन दिवसाचा दौरा करणार आहेत. त्या निमित्ताने कल्याण लोकसभेमध्ये केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री युवा व्यवहार क्रीडा मंत्री भारत सरकार अनुराग ठाकूर हे ११, १२, आणि १३ सप्टेंबर रोजी कल्याण लोकसभा क्षेत्रामध्ये पक्ष संघटनेच्या वाढीकरिता लोकसभा मजबूत करण्याकरिता प्रवास करणार आहेत.
त्यांचा तीन दिवसाचा प्रवास आहे. या तीन दिवसांमध्ये ते पक्षाच्या बैठकांसहित विविध मान्यवरांच्या भेटीगाठी घेणार आहेत. तसेच शासकीय अधिकाऱ्यांच्या बैठका घेणार असल्याची माहिती कल्याण जिल्हा अध्यक्ष व कल्याण लोकसभा संयोजक शशिकांत कांबळे यांनी दिली.