नेशन न्यूज मराठी नेटवर्क.
नवी दिल्ली/प्रतिनिधी – केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी काही देशांमध्ये कोविड-19 रुग्णांच्या संख्येत नुकत्याच झालेल्या वाढीचे गांभीर्य लक्षात घेऊन भारतातील कोविड-19 परिस्थितीचा आणि स्थितीवर देखरेख, प्रतिबंध आणि व्यवस्थापनासाठी सार्वजनिक आरोग्य प्रणालीच्या सज्जतेचा एका उच्चस्तरीय बैठकीत आढावा घेतला. या बैठकीला केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती प्रवीण पवार, नीती आयोगाचे आरोग्य सदस्य डॉक्टर व्ही के पॉल आणि इतर वरिष्ठ अधिकारी तसेच सार्वजनिक आरोग्य तज्ञ उपस्थित होते. यावेळी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना जगभरातल्या कोविड-19 परिस्थितीची आणि स्थानिक पातळीवर दिसत असलेल्या चित्राची माहिती देण्यात आली.
चीन, जपान, दक्षिण कोरिया, फ्रान्स आणि अमेरिका यांसारख्या काही देशांमध्ये कोविड-19 रुग्णांच्या संख्येत झालेल्या वाढीने निर्माण झालेल्या आव्हानाला अधोरेखित करत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी आपल्या सज्जतेचे आणि नव्या आणि उदयाला येणाऱ्या कोविड-19 परिवर्तकाच्या विरोधात, विशेषतः आगामी काळात येऊ घातलेल्या उत्सवाच्या तोंडावर सज्ज राहण्याचे आणि दक्ष राहण्याचे महत्त्व नमूद केले. कोविड-19 अद्याप संपलेला नाही याकडे लक्ष वेधत आणि या इशाऱ्याचा पुनरुच्चार करत त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना पूर्णपणे दक्ष राहण्याचे आणि परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले. लोकांनी कोविड 19 प्रतिबंधासाठी आवश्यक असलेल्या वर्तनाचा अंगिकार करावा आणि कोविड प्रतिबंधक लस घ्यावी असे आवाहन त्यांनी केले.

देशामध्ये जर कोणतेही नवे उत्परिवर्तक पसरत असतील तर त्यांचा वेळेत शोध घेण्यासाठी, पॉझिटिव्ह रुग्णांच्या नमुन्याची संपूर्ण जनुकीय क्रमवारी इंडियन सार्स कोव्ह-2 जिनोमिक्स कन्सोर्टियम( इन्साकॉग) च्या जाळ्याच्या मदतीने निश्चित करण्यासाठी देखरेख प्रणाली बळकट करण्याचे निर्देश डॉ. मनसुख मांडविया यांनी दिले. यामुळे योग्य प्रकारच्या सार्वजनिक आरोग्य उपाययोजना हाती घेता येतील. कोणताही नवा उत्परिवर्तक असल्यास कोविड-19 च्या सर्व पॉझिटिव्ह रुग्णाचे नमुने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी दररोज इन्साकॉग जिनोम सिक्वेन्सिंग लॅबोरेटरीज(आयजीएसएल) कडे पाठवावेत अशी विनंती राज्ये/केंद्रशासित प्रदेश यांना करण्यात आली आहे.
यावेळी एका सादरीकरणाद्वारे केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना भारतात 19 डिसेंबर 2022ला संपलेल्या आठवड्यात दैनंदिन रुग्णाच्या संख्येत नियमित गतीने घट होत असल्याची आणि ही संख्या दिवसाला सरासरी 158 पर्यंत खाली आल्याची माहिती देण्यात आली.
मात्र, गेल्या 6 आठवड्यांपासून जागतिक दैनंदिन सरासरीमध्ये निरंतर वाढीची नोंद झाली असून 19 डिसेंबर ला संपलेल्या आठवड्यात दररोज सरासरी 5.9 लाखांपर्यंत नव्या रुग्णांची नोंद होत आहे.
BF.7 हा नवा आणि अतिशय जास्त संसर्गकारक असलेला ओमायक्रॉनचा उत्परिवर्तक चीनमंध्ये खूप जास्त प्रमाणात झालेल्या संसर्गवाढीला कारणीभूत असल्याचे मानले जात आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यापूर्वीच जून 2022 मध्ये कोविड-19 संदर्भात सुधारित देखरेख धोरणासाठी परिचालनात्मक मार्गदर्शक नियमावली जारी केली आहे. यामध्ये वेळेवर निदान, विलगीकरण, चाचणी आणि संशयित आणि आजाराची पुष्टी केलेल्या रुग्णाचे योग्य व्यवस्थापन यांचा समावेश आहे. या सर्वांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिले.
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण, प्रधान वैज्ञानिक सल्लागार प्रो. अजय कुमार सूद, जैवतंत्रज्ञान विभागाचे सचिव डॉ. आर एस गोखले, आयुष सचिव राजेश कोटेचा, आरोग्य संशोधन विभागाचे सचिव डॉ. राजीव बहल, डीजीएचएस डॉ. अतुल गोयल, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव लव अग्रवाल, कोविड कार्यगटाचे अध्यक्ष डॉ. एन के अरोरा, राष्ट्रीय लसीकरण तांत्रिक सल्लागार समूह(एनटीएजीआय) या बैठकीला उपस्थित होते.
Related Posts
-
केंद्रीय आरोग्य सचिवांनी बिल्थोव्हेन बायोलॉजिकल औषध कंपनीला दिली भेट
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - केंद्रीय आरोग्य…
-
कोविड रुग्णांच्या मदतीसाठी रात्रीच्या वेळी आता केडीएमसीची मध्यवर्ती वॉररुम
कल्याण/प्रतिनिधी - कोरोनाचा वाढता प्रभाव आणि रात्री - अपरात्री रुग्णांच्या नातेवाईकांची…
-
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब मंत्रालयाला पोर्टर प्राईज २०२३ पुरस्कार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - आरोग्य क्षेत्रातील प्रयत्न, विशेषतः…
-
आरोग्य विभागाच्या परीक्षा केंद्राला आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची भेट
परभणी/प्रतिनिधी - आरोग्य विभागाच्या दिनांक 25 व 26 सप्टेंबर रोजी गट…
-
बुलढाण्यात कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. बुलढाना/प्रतिनिधी - कोरोनासारख्या महामारीच्या काळात…
-
आरोग्य विभागात २२०० पदे भरण्यास मान्यता,जनतेला अधिक दर्जेदार आरोग्य सेवा मिळणार - आरोग्य मंत्री राजेश टोपे
मुंबई/प्रतिनिधी - राज्याच्या ग्रामीण भागामध्ये बांधकाम पूर्ण झालेल्या सार्वजनिक आरोग्य…
-
भिवंडीतील आरोग्य सेवा सुधारण्यासाठी आमदारांनी घेतली राज्याच्या आरोग्य सेवा आयुक्तांची भेट
मुंबई /प्रतिनिधी - भिवंडीतील आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी तसेच शहरातील एकमेव स्व. इंदिरा…
-
जागतिक आरोग्य दिनानिमित्त ‘फिट महाराष्ट्र’ उपक्रम
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- जागतिक आरोग्य दिनानिमित्त सार्वजनिक आरोग्य…
-
सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे लघुचित्रपट स्पर्धेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई -आरोग्यदायी निरोगी जीवनशैली आणि सार्वजनिक…
-
प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात कर्मचाऱ्यांचा तुटवडा; रुग्णाची हेळसांड
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक / प्रतिनिधी - केंद्र व…
-
ठाणे जिल्हा परिषदेच्या विविध आरोग्य केंद्रांना पुरस्कार
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी - केंद्र व राज्य…
-
राज्यातल्या आरोग्य संस्थांच्या उभारणीसाठी हुडकोकडून कर्ज
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - राज्यातील नवीन आरोग्य संस्थांचे…
-
संगमनेर तालुक्यात आरोग्य पोषण अभियानास सुरुवात
नेशन न्यूज मराठी टीम. अहमदनगर / प्रतिनिधी - लहान बालके…
-
आरोग्य सेवा आयुक्तपदाचा तुकाराम मुंढे यांनी स्वीकारला कार्यभार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - आरोग्य सेवा आयुक्त आणि राष्ट्रीय…
-
कल्याण मध्ये पत्रकारांचे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न
प्रतिनिधी. कल्याण - पत्रकार फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव पंजाबी यांचा वाढदिवसानिमित्त पत्रकार…
-
आरोग्य विद्यापीठाच्या ग्रीष्मकालीन आंतरवासीयता योजनेस प्रारंभ
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या…
-
प्रहारचे मनपा आरोग्य अधिकाऱ्याच्या विरोधात चिखलात झोपून आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. सोलापूर / प्रतिनिधी - नागरिकांची अनेकदा…
-
समान काम समान वेतनासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांचे पीपीई किट घालून आंदोलन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. धुळे/प्रतिनिधी - राष्ट्रीय आरोग्य अभियान…
-
नाशिक येथे पश्चिमी राज्यांसाठी दुसऱ्या समुदाय आरोग्य अधिकारी परिषदेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टिम. मुंबई/प्रतिनिधी - पश्चिम विभागीय राज्यांसाठी आयोजित…
-
आरोग्य विभागाच्या तत्सम योजना जिल्हा वार्षिक योजना म्हणून राबविण्यास मान्यता
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील आरोग्य सुविधा बळकट करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार…
-
विविध मागण्यांसाठी आरोग्य केंद्रासमोर दहा गावातील सरपंचाचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. बुलढाणा / प्रतिनिधी - जलंब येथील…
-
दहा हजार आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पदांच्या भरतीसाठी प्रस्ताव सादर
मुंबई/प्रतिनिधी - संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाला जर…
-
केडीएमसीच्या आरोग्य सेवेच्या विविध पदांसाठी इच्छुकांची गर्दी
कल्याण/ प्रतिनिधी - कल्याण डोंबिवलीमध्ये वाढत्या कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी आरोग्य…
-
आरोग्य महात्मा फुले जनआरोग्य योजनेची व्याप्ती वाढणार. सर्वसामान्य रूग्णांना दिलासा
मुंबईः राज्यातील सर्वसामान्यांच्या उपचारासाठी महत्वाच्या ठरलेल्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेची…
-
यंदाची दिवाळी कोविड योध्यांचा सन्मान करण्याची
प्रतिनिधी. कल्याण - कल्याण डोंबिवली मनपाच्या वतीने भिंवडी बायपास येथे…
-
माघी गणेशोत्सवानिमित्त अलका सावली प्रतिष्ठानच्या वतीने आरोग्य शिबीर
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - माघी गणेशोत्सवानिमित्त बेतूरकर पाडा येथील…
-
सामान्य माणसाच्या आरोग्य सेवेसाठी वंचित बहुजन आघाडी मैदानात
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली / प्रतिनिधी - नागरिकांना सर्व…
-
लायन्स क्लबच्या माध्यमातून भारत को ऑपरेटिव्ह बँकेत आरोग्य शिबीर
कल्याण/संघर्ष गांगुर्डे- सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या लायन्स क्लबच्या माध्यमातून कल्याणातील…
-
महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेस एम.फील पदव्युत्तर पदवी सुरु करण्यास मान्यता
मुंबई/प्रतिनिधी - पुणे येथील महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेस एम. फील…
-
सार्वजनिक आरोग्य विभागाचे स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी ‘आमची मुलगी’ संकेतस्थळ सुरु
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील गर्भलिंग निदान प्रतिबंध,…
-
आरोग्य विभागाच्या गट क आणि ड संवर्गातील परीक्षा लांबणीवर
मुंबई/प्रतिनिधी - राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट क आणि…
-
केंब्रिया इंटरनॅशनल कॉलेजच्या माध्यमातून मानसिक आरोग्य विषयी जनजागृती
नेशन न्यूज मराठी टीम.कल्याण/प्रतिनिधी - सध्या जगभरात मानसिक आरोग्य सप्ताह…
-
केडीएमसीची आरोग्य सेवा साथ आजारांना तोंड देण्यासाठी तोकडी - वरुण पाटील
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवलीमध्ये सध्या साथीच्या…
-
राज्यात दहा कोटी लसीकरण सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाने आज दहा कोटींचा टप्पा पार…
-
मेळघाटातील धाराकोटमध्ये कोविड प्रतिबंधक लसीकरण यशस्वी
अमरावती/प्रतिनिधी - लसीकरणाला सुरुवातीला नकार देणाऱ्या धाराकोटच्या नागरिकांना लसीकरणाचे महत्त्व पटवून…
-
केडीएमसीच्या कोविड रुग्णालयात महिला रुग्णाची सुखरुप प्रसुती
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आर्ट गॅलरी,कल्याण प. येथील कोविड…
-
केडीएमसीच्या नागरी आरोग्य केंद्रातील ओपीडी संध्याकाळी देखील राहणार सुरु
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील रुग्णांना दिलासा मिळाला असून केडीएमसी…
-
जानेवारीअखेर आरोग्य विभागातील पदभरतीसाठीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आरोग्यमंत्री यांचे निर्देश
प्रतिनिधी. मुंबई - सार्वजनिक आरोग्य विभागातील पदभरतीसाठीची प्रक्रिया जानेवारी अखेरपर्यंत…
-
आरोग्य विभागातील विविध संवर्गातील १६ हजार पदे तातडीने भरणार- राजेश टोपे
मुंबई/ प्रतिनिधी - कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर…
-
आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांची नियुक्ती
नाशिक/प्रतिनिधी - लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी राजीव कानिटकर यांची नाशिक…
-
१९ मे पासून आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षा
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या…
-
आरोग्य विभागाच्या परीक्षा प्रकरणी निवृत्त मुख्य सचिवांमार्फत चौकशी करणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई- आरोग्य विभागाच्या गट क आणि गट…
-
पनवेल मध्ये डेंग्यू,मलेरियाच्या रुग्ण संख्येत वाढ
नेशन न्यूज मराठी टीम. पनवेल / प्रतिनिधी - पनवेल महापालिका…
-
कोविड पार्श्वभूमीवर कलाकारांना ३१ मार्च २०२३ पर्यंत अर्थसहाय्य
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - कोविड पार्श्वभूमीवर कलाकारांना देण्यात…
-
आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षेस प्रारंभ
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या…
-
नागपूर हज हाऊसमध्ये कोविड सेंटर होणार सुरु
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य हज समितीच्या अखत्यारित असलेल्या…