महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
चर्चेची बातमी

कल्याण पूर्वेतअज्ञात समाजकंटकांनी रिक्षा जाळली रिक्षा चालकास नगरसेवकाचा मदतीचा हात

प्रतिनिधी.

कल्याण – कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरात राहणाऱ्या मिलिंद पवार या रिक्षा चालकाची रिक्षा अज्ञात समाज कंटकांनी जाळल्याने रिक्षावर उदरनिर्वाह करणाऱ्या पवार कुटूंबियांवर संकट कोसळले होते.आधीच साडे चार महिने करोना लॉकडाऊनमुळे रिक्षा व्यवसाय बंद असल्याने रिक्षाचालकावर उपासमारीची वेळ आली होती. त्यातच रिक्षा व्यवसाय काही प्रमाणात सुरू होताच समाज कंटकांनी या रिक्षा चालकाचे उदरनिर्वाहाचे साधन असलेली रिक्षा जाळल्याने रिक्षा चालकाच्या चिंतेत भर पडली. रिक्षाचालक पवार यांनी या प्रकरणी रिक्षा जाळल्या प्रकरणी  कोळसेवाडी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून पोलिसांनी या समाजकंटकांचा शोध सुरू केला आहे .तर अशा प्रकारे समाज कंटकांकडून रिक्षा जळण्याचे प्रकार वारंवार समोर येत असून  आशा समाज कंटकावर कारवाई ची मागणी रिक्षा संघटनेने केली आहे.तर  या रिक्षा चालकाची माहिती मिळताच नगरसेवक महेश गायकवाड यांनी तत्काळ या रिक्षा दुरुस्तीसाठी लागणार खर्च देत त्याला पुन्हा उभारी दिली आहे. गायकवाड यांनी दाखविलेल्या माणुसकीमुळे या रिक्षा चालकाला पुन्हा उभे राहण्याची उमेद मिळाली आहे.

Translate »
×