महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
ठाणे ताज्या घडामोडी

निवडणूक आयोगाच्या उपक्रमांतर्गत ज्येष्ठ नागरिकांनी घरीच बजावला मतदानाचा अधिकार

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

नवी मुंबई/प्रतिनीधी – लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून ज्या नागरिकांचे वय 85 पेक्षा जास्त आहे आणि ज्यांना शारिरीक व्याधीमुळे मतदान केंद्रावर जाऊन मतदान करणे शक्य नाही अशा ज्येष्ठ मतदारांसाठी घरीच मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या मतदान प्रक्रियेमध्ये निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी घरी जातात व ज्येष्ठ मतदारांना मतदान करण्याची सोय उपलब्ध करून देतात. नवी मुंबईतील अनेक नागरिकांनी आपल्या घरी मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी त्यांनी आपल्याला घरीच मतदान करता आले,आपला मतदानाचा हक्क बजावता आल्याने निवडणूक आयोगाचे या मतदारांनी आभार मानले आहेत तर या निर्णयाने कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहणार नसून यामुळे लोकशाही अधिक बळकट होणार असल्याने मत मतदारांनी व्यक्त केले आहे.

Translate »
×