Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
कृषी ताज्या घडामोडी

जिल्हा कृषी महोत्सवअंतर्गत,ग्लोबल शेतकरी कृषी प्रदर्शनचे आयोजन

नेशन न्यूज मराठी टीम.

पुणे/प्रतिनिधी – जिल्हा कृषी महोत्सवअंतर्गत कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), पुणे आणि ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांसाठी ९ ते १२ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत नारायणगाव येथे ‘ग्लोबल शेतकरी कृषी प्रदर्शन’ आयोजित करण्यात आले आहे. ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्राच्या प्रांगणात होणाऱ्या या कृषी प्रदर्शनात शिवार फेरी, पीक प्रात्यक्षिके, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील कृषी ज्ञान, तंत्रज्ञान संशोधनात अग्रेसर असलेल्या २५० हून अधिक राष्ट्रीय, बहुराष्ट्रीय कंपन्या, शासकीय विभागांचा, संस्थांचा सहभाग असणार आहे. यामध्ये नवीन खते, औषधे, बियाणे, यंत्र, अवजारे, उपकरणे, शेतमाल विक्री, करार शेती, स्वयंसेवी संस्था आणि कृषी तंत्रज्ञानबाबत सादरीकरण करण्यात येणार आहे.

शेळीपालन, दुग्धव्यवसाय, विविध शेतीपूरक जोडधंदे, शासकीय योजना, मुल्यवर्धन प्रक्रिया, उत्पादन ते विक्री, हायटेक शेती तंत्रज्ञान, कांदा, टोमॅटो, द्राक्ष उत्पादन आदी विषयांवरील पीक परिसंवाद, शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासाला नवी दिशा देणारी विशेष चर्चासत्रे देखील आयोजित केली आहेत. कृषि क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले महिला व पुरुष शेतकरी, कृषि उद्योजक, कृषि पत्रकार, कृषि विस्तार कार्यकर्ता यांना ग्रामोन्नती कृषि सन्मानाने गौरविण्यात येणार आहे. हे प्रदर्शन सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरु राहणार असून शेतकरी, विद्यार्थी, कृषि उद्योजक, कृषि सेवा पुरवठादार आदींसह नागरिकांनी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आत्मा पुणेच्या प्रकल्प संचालकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
X