कल्याण/ प्रतिनिधी – कोरोनाच्या परिस्थितीत बेड, ऑक्सिजन, रेमडीसीवीर इंजेक्शनसोबत आणखी कोणत्या गोष्टीची कमतरता असेल तर ‘प्लाझ्मा’. दररोज आढळणाऱ्या आणि बऱ्या होणाऱ्या हजारो रुग्णांच्या तुलनेत ‘प्लाझ्मादाना’साठी अगदी काही व्यक्तीच पुढाकार घेत असल्याने प्लाझ्माचीही मोठी समस्या भेडसावत आहे. मात्र कल्याण आणि जुन्नरमधील दोघा तरुणांनी सुरू केलेल्या रक्त आणि प्लाझ्मादानाच्या लढ्यामूळे आज शेकडो कोवीड रुग्णांचे प्राण वाचण्यासाठी मदत झाली आहे. कल्याणातील किशोर सातपुते आणि जुन्नरमधील ऋषी साबळे अशी या दोघांची नावे आहेत.

कल्याणचा किशोर सातपुते हा एका नामांकित फार्मा कंपनीत नोकरीला होता. तर जुन्नरचा ऋषी साबळेची शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी. किशोरला तर रक्तदान हा केवळ शब्द ठाऊक. मात्र एका ‘गर्भवती महिलेला रक्त पाहीजे असल्याच्या’ मेसेजने किशोरचे संपूर्ण आयुष्यच बदलून टाकले. किशोरने हा मेसेज सहजपणे सोशल मीडियावर टाकला आणि त्यामुळे संबंधित महिलेला रक्त उपलब्ध होऊन तिचा आणि बाळाचा दोघांचाही जीव वाचण्यास मदत झाली. या घटनेचा किशोरच्या मनावर इतका खोल परिणाम झाला आणि त्यातूनच मग पुढे रक्तदानासाठी काम करणाऱ्या ऋषी साबळेशी ओळख झाली आणि मग ‘लढा रक्तदाना’चा ही मोहीम,चळवळ उभी राहिली. किशोर आणि ऋषीने वर्षभरापूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून अक्षरशः वाहून घेतल्याप्रमाणे ‘लढा रक्तदाना’साठीचे काम सुरू केले. ज्यातून दोघांनीही आजपर्यंत तब्बल 700 जणांना रक्त तर 500 जणांना प्लाझ्मा उपलब्ध करून देत जीव वाचवला आहे. किशोरला तर आईची तब्येत आणि या कामासाठी देण्यासाठी वेळ मिळत नसल्याने नोकरीवरही पाणी सोडावे लागले आहे. तर किशोरचे हे सामाजिक काम बघून त्याला कोणतीही आर्थिक अडचण येऊ नये म्हणून त्याचे काही मित्र त्याला जमेल तशी मदत करत आहेत. आजच्या कठीण काळात किशोर आणि ऋषीने केलेल्या कामाची निश्चितच तोड नाहीये.

मात्र सध्या एवढ्या मोठ्या संख्येने कोवीड रुग्ण सापडत असले तरी प्लाझ्मादानासाठी कोणी पुढाकार घेत नसल्याची खंत किशोरने माध्यमांशी बोलताना बोलून दाखवली. इतरांनी प्लाझ्मा दिला म्हणून ते आज बरे होऊ शकले. त्यामुळे त्यांनीही सामाजिक बांधिलकी जपत इतरांना प्लाझ्मा देण्यासाठी पुढे येण्याची गरज असून दुर्दैवाने तसे होताना दिसत नसल्याचे किशोरने सांगितले.
तर येत्या 1 मे पासून 18 वर्षांवरील तरुण तरुणींना कोवीड लस देण्यात येणार आहे. परंतू लस घेतल्यानंतर 1 ते 2 महिने रक्तदान करता येत नाही. तसे झाल्यास आपल्याकडे रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर लस घेण्यापूर्वी अधिकाधिक युवा पिढीने रक्तदान करण्याचे आवाहनही किशोरने केले आहे.
Related Posts
-
कोरोनाशी दोन हात करत रुग्णांचे प्राण वाचविणाऱ्या डॉक्टरांचा सन्मान
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कोरोना महामारीच्या काळात ज्यांना तहान-भूक मिटवण्याचीही उसंत नव्हती.…
-
बस चालकाच्या सतर्कतेमुळे वाचले अनेक प्रवाशांचे प्राण
नेशन न्यूज मराठी टीम. जळगाव/प्रतिनिधी - जळगावातील जामनेर जवळ धावत्या…
-
कोवीड रुग्णांवर विनामूल्य अंत्यसंस्कार करण्याचा केडीएमसीचा निर्णय
कल्याण/ प्रतिनिधी - कल्याण डोंबिवलीमध्ये एकीकडे कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक…
-
कल्याण स्थानकात आर.पी.एफ. जवानाने वाचवले महिलेचे प्राण
प्रतिनिधी. कल्याण - रेल्वे स्थानकात आज सकाळी नऊ वाजता उद्यान…
-
भारतीय तटरक्षक दलाने ३६ जणांचे वाचवले प्राण
नेशन न्यूज मराठी टीम. गोवा/प्रतिनिधी - भारतीय तटरक्षक दलाने धाडसी…
-
जलद तत्परतेने समन्वय साधून तटरक्षक दलाने वाचविले मच्छीमाराचे प्राण
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय तटरक्षक…
-
कल्याणात पार पडला अनोखा 'कोवीड योद्धा' कृतज्ञता सन्मान सोहळा
प्रतिनिधी. कल्याण - कोरोना काळात समोर आलेल्या समाजातील नकारात्मक चेहऱ्यांबरोबर…
-
थर्टीफर्स्टच खर्च टाळत,फुटपाथ वरील लोकांना तरुणांनी केले ब्लॅंकेट वाटप
नेशन न्युज मराठी टीम. कल्याण- थर्टीफर्स्ट म्हणजेच 31 डिसेंबर म्हणजे…
-
प्राण जाये पर पाणी न जाय -काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे
सोलापूर /प्रतिनिधी - सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उजनी धरणातील…
-
झोपड्या वाचविण्याचा लढा माझा आहे- गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - रेल्वेने घरं रिकामी करण्याच्या…
-
बेजबाबदार पोलिसांवर कारवाई करावी, एकत्र येऊन लढा देऊ - सुजात आंबेडकर
प्रतिनिधी. पुणे - राज्यात दलितांवरील हल्ल्यात वाढ होत असून हल्लेखोरांना…
-
संत गाडगेबाबाच्या विचारानेच स्वच्छता करण्याची प्रेरणा, तरुणांनी श्रमदानातून केली स्वच्छता
प्रतिनिधी. सोलापूर - माणसाने माणसाबरोबर माणसासारखे वागावे असा महान विचार…
-
डोंबिवलीत कोरोनाविरोधात सर्वपक्ष एकत्र,लवकच डोंबिवलीत सर्वपक्षीय कोवीड मदत केंद्र
कल्याण प्रतिनिधी - राज्यात एकीकडे कोरोनाच्या विषयावरून जोरदार राजकारण सुरू…
-
हिंगोली काँग्रेसच्या पंचायत समिती सदस्या सह शेकडो कार्यकर्त्यांचा वंचित मध्ये प्रवेश
हिगोली/प्रतिनिधी - हिंगोली येथील काँग्रेसचे पंचायत समिती सदस्यसह शेकडो कार्यकर्त्यांसह…
-
कल्याण- डोंबिवलीकरांनसाठी आनंदाची बातमी, केडीएमसीचा कोवीड निर्बंधांमध्ये लेव्हल २ मध्ये समावेश
कल्याण/प्रतिनिधी- कल्याण डोंबिवलीतील नागरिक आणि व्यापारी वर्गासाठी अत्यंत आनंदाची तसेच…
-
कल्याण मध्ये कोवीड प्लाझ्मा ड्राईव्ह उपक्रम,डोनर्सना नोंदणी करण्याचे आवाहन
प्रतिनिधी. कल्याण - कोरोना रुग्णांना बरे करण्यासाठी 'प्लाझ्मा' महत्वाची भूमिका…
-
जातीय अत्याचारविरोधी न्यायाचा लढा सुरु ठेवत आंदोलनाचा ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सरकारला इशारा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/ प्रतिनिधी - राज्यात दर दिवशी…
-
‘सिया’- न्यायासाठी निर्दयी समाज व्यवस्थेशी लढा देणाऱ्या मुलीची गोष्ट
नेशन न्यूज मराठी टीम. गोवा/प्रतिनिधी - ‘सिया’ हा आपल्या सामाजिक…
-
कल्याण डोंबिवलीत मास्क न लावणाऱ्यांची होणार कोवीड चाचणी तर मॅरेज हॉल होणार सील
कल्याण प्रतिनिधी -वाढत्या कोवीड संख्येच्या पार्श्वभूमीवर रविवारी शासनाने नविन निर्बंध…
-
रेल्वे रुळावर पडलेल्या इसमाचे प्राण वाचविणाऱ्या लता बनसोडे यांचा महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला सत्कार
प्रतिनिधी. मुंबई - पश्चिम रेल्वेच्या ग्रांट रोड रेल्वे स्थानकावरील रेल्वे…
-
कोरोना रुग्णांचे वाढते प्रमाण लक्षात घेता मुख्यमंत्र्यांकडून आढावा, दिले हे आदेश
मुंबई प्रतिनिधी- कोरोनाविषयक सर्वत्र दाखविल्या जाणाऱ्या बेफिकीरीबाबत चिंता व्यक्त करतानाच…