Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
चर्चेची बातमी पोलिस टाइम्स

चाकूचा धाक दाखवून ट्रॅव्हल चालकाला लुबाडणारे दोघे जेरबंद

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

धुळे/प्रतिनिधी – धुळे शहरात गुंडगिरी वाढत आहे. कारण साक्रीरोड परिसरात ट्रॅव्हल्स चालक व वाहकास धारदार शस्त्राचा धाक दाखवून लुबडण्यात आले. या प्रकरणात पोलिसांनी जबरन वसुली करणाऱ्या या दोन सराईत चोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून नशेच्या गोळ्यांसह गुंगीचे औषध, रोख रक्कम व मुद्देमाल जप्त केला आहे.

मध्यरात्रीच्या सुमारास ट्रॅव्हल चालकांना रस्त्यात अडवून व चाकूचा धाक दाखवत त्यांच्याकडून जबरन वसुली केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. ट्रॅव्हलचालकाने 112 हेल्पलाईन क्रमांकावर या संदर्भात फोन करून हा सर्व प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आणून दिला. धुळे शहर पोलिसांनी तात्काळ यासंदर्भात ॲक्शन घेत पोलीस पथक संबंधित ठिकाणी रवाना केले. पोलिसांनी गुन्ह्यातील दोन्ही सराईतांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडील नशेच्या गोळ्या, गुंगीचे औषध देखील पोलिसांना जप्त केले. पोलिसांच्या कारवाईत दोघेही आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचे उघडकीस झाले आहे. या प्रकरणात शहर पोलीस पुढील कारवाई करत असल्याची माहिती सहायक पोलिस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांनी दिली.

Translate »
X