नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण/प्रतिनिधी – कल्याण पश्चिमेतील रेल्वे स्टेशन परिसरात मोक्याच्या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले स्मारक आहे मात्र त्या स्मारकाला कधी भिकाऱ्याचा कधी दुचाकी गाड्यांचा विळखा असतो त्यामुळे काही प्रमाणात समारकांचे विद्रोपीकरण होत आहे त्यामुळे स्थानिक प्रशासन महापुरुषाच्या स्मारकाबाबत किती जागृत आहे यावरून लक्षात येते.यामुळे त्यांच्या अनुयायी वर्गामध्ये नाराजीचा सूर आहे. स्थानिक प्रशासन महापुरुषाच्या स्मारकाबाबतकधी जागृत होईल असा सवाल सामान्य नागरिकांच्या मनात आहे.
कल्याणच्या महात्मा ज्योतिबा फुले स्मारकाला गर्दुल्याचा ,भिकाऱ्यांना विळखा असतो आता तर दुचाकी वाहनाचा विळखा पडलेला दिसतो, परिसरात स्मार्ट सिटी काम सुरू आहे त्यात वाहतूक कोंडी प्रवाश्यांना, चाकरमान्यांना वाट काढताना तारेवरची कसरत करावी लागते. त्याच परिसरात महात्मा ज्योतिबा फुले स्मारक असल्याने या स्मारकाला चक्क दुचाकी वाहनाचा गराडा असतो.परिणामी स्मारका जवळ जाण्यासाठी रस्ताचा उरत नाही. त्यात गंमत म्हणजे वाहतूक पोलिसांचे कार्यालय हे हाकेच्या अंतरावर आहे.याचा अर्थ असा आहे का प्रशासन फक्त महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथी असेल तेव्हाच त्यांच्या स्मारकाकडे लक्ष देणार का? असा संतप्त सवाल जागरूक नागरिक करत आहेत. त्याच बरोबर प्रशासन महात्मा ज्योतिबा फुले स्मारकाला या विळख्यातून कधी सोडवतील याची वाट पाहत आहेत.