नेशन न्यूज मराठी टीम.
अहमदनगर / प्रतिनिधी – नगर आणि पुणे जिल्ह्यातून दुचाकी चोरणाऱ्या व त्या विकत घेणाऱ्या तिघांना श्रीगोंदा पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून चोरीच्या सहा दुचाकी असा ५ लाख ७० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. तिघां आरोपींना श्रीगोंदा पोलिसांनी अटक केली आहे.
सदरची कारवाई श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक समीर अभंग, पो.ना.गुलाब मोरे, गोकुळ इंगावले, पो. कॉ. प्रताप देवकाते, मनोज साखरे, तसेच मोबाईल सेलचे राहुल गुंडु, नितीन शिंदे व सेवानिवृत्त स.फौ.अंकुश ढवळे यांनी केली आहे.