महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image ठाणे ताज्या घडामोडी

डोंबिवलीत रेल्वेची कच्ची भिंत कोसळून दोन मजूर मृत,तीन जखमी

नेशन न्यूज मराठी टीम.

डोंबिवली/प्रतिनिधी – रेल्वेच्या संरक्षक भिंतीचे काम सुरू असताना बाजूला असणारी जुनी भीत अंगावर कोसळून दोन कामगार मृत तर तीन जण गंभीर जखमी झाले.ही घटना बुधवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास कोपर रोडवरील सीमा डेकोरेटरजवळ घडली. डोंबिवली पश्चिम सिद्धार्थ नगर परिसरात दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मल्लेश चव्हाण (35), आणि बंडू कोवासे (50) य दोघांचा मृत्यू झाला असून माणिक ओवर (62) ,विनायक चौधरी (35) , युवराज वेडगुत्तलवार (35) अशी जखमींची नावे आहेत. हे सर्व कामगार मुलाचे आंध्र येथे राहणारे असून सध्या ते दिवा आणि मुंब्रा परिसरात राहत आहेत.

घटना घडल्यानंतर सिद्धार्थ नगर गोंधळी समाज जोशी मित्रमंडळ वस्तीतील तरुण मदतीला धावून आले. किशोर भिसे, दत्ता म्हात्रे, श्रावण माने, लेखन पैठणे, रोहित इंगळे, सतीश जोशी हे देवीचे मंडप बांधण्याच्या तयारीत व्यस्त असतानाच अचानक ओरडण्याचा आवाज आल्याने हे सर्व मंडळी पुढे धावून गेले. यावेळी या सर्व तरुणांनी धावपळ करत या सर्व कामगारांना ढिगाऱ्यातू बाहेर काढण्यासाठी मदतीचा केली.घटनास्थळी अग्नीशमनदल व पोलिस दाखल झाले.

सिद्धार्थ नगर वस्तीतील नागरिकांची घरे पाडली तेव्हाच ही जुनी भिंत पण पाडा असे वस्तीतील नागरिकांनी प्रशासनाला सांगितले होते. मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे वस्तीतील महिलांनी सांगितले. मजुरांना पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल केले आहे. हा अपघात कसा झाला पुढील तपास पोलिस करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×