नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम.
डोंबिवली/प्रतिनिधी – डोंबिवलीतील पलावा परिसरात एमडी ड्रग्स विक्रीसाठी आलेल्या दोन जणांना मानपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या दोन्ही आरोपींकडून मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग्स आणि अडीच लाख रुपये जप्त करण्यात आले असून या दोघांनी हे ड्रग्स कुठून आणले व कोणाला देणार होते या सर्व गोष्टीचा तपास मानपाडा पोलीस करत आहेत.
आरोपींकडून एकुण २,३२,०००/-रू किंमतीची ५८ ग्रम वजनाची सफेद रंगाची किस्टल एम.डी. पावडर (Methadone) हा अंमली पदार्थ तसेच एक होंडा सिबीआर मोटार सायकल, दोन मोबाईल फोन असा एकूण ५,३०,४४०/-रू किंमतीचा मुद्देमाल कायदेशीर तरतुदीचे पालन करून हस्तगत करण्यात आलेला आहे.आरोपीत आर्शद करार खान हा अंमली पदार्थ जवळ बाळगून विक्री करणारा सराईत गुन्हेगार असुन, त्याच्यावर यापुर्वी दाखल गुन्हे दाखल आहेत.