नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
नवी दिल्ली/प्रतिनिधी – किनारपट्टीवरील लोकांसाठी तस्करी हा नवा विषय नाही. सोने-चांदी पासून ते अंमली पदार्थ यांच्या तस्करीचे प्रामाण गेल्या काही वर्षात काढले आहे. भारतीय तटरक्षक दल (आयसीजी) आणि गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) मोठी कामगिरी केली आहे. या कारवाईत अरबी समुद्रात 173 किलो अमली पदार्थ घेऊन जाणारी मासेमारी नौका पकडली आहे. तसेच त्यावरील दोन गुन्हेगारांना ताब्यात बेड्या थोकण्यात आल्या.
एटीएस गुजरातने पुरवलेल्या विश्वासार्ह आणि गुप्तचर माहितीच्या आधारावर, संशयित नौकेवर पाळत ठेवून भारतीय तटरक्षक दलाने कारवाई केली. नौका ताब्यात घेतल्यावर केलेल्या तपासामधून गुप्तचर यंत्रणेने दिलेली माहिती अचूक असल्याचे, तसेच ही नौका आणि अटक करण्यात आलेल्या आरोपींचा अमली पदार्थांच्या तस्कारीमध्ये सहभाग असल्याचे सिद्ध झाले. या प्रकरणी नौकेवरील व्यक्तींची चौकशी सुरु आहे.
भारतीय तटरक्षक दलाने गेल्या तीन वर्षात राबवलेली अशा प्रकारची ही बारावी जप्ती मोहीम आहे. नुकतीच मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ वाहून नेणारी एक पाकिस्तानी मासेमारी नौका ताब्यात घेण्यात आली, या कारवाईचाही यात समावेश आहे. यामधून या दोन्ही संस्थांची देशाच्या सागरी सीमांचे रक्षण करण्याची आणि समुद्रातील बेकायदेशीर कारवायांचा बीमोड करण्याची वचनबद्धता अधोरेखित होते.