नेशन न्यूज मराठी टीम.
धुळे / प्रतिनिधी – मध्यप्रदेश मधून शिरपूर कडे अवैधरित्या ट्रक मधून वाहतूक होणाऱ्या दारू साठ्यासह पोलिसांनी दोघा जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत, शिरपूर पोलिसांना खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अवैधरित्या दारूने भरलेले दोन मालट्रक मध्यप्रदेश येथून शिरपूर मार्गे धुळ्याकडे येत आहेत असे समजले. शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती मिळताच, पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ यासंदर्भात खात्री करण्यासंदर्भात सापळा रचला. या सापळ्या दरम्यान दोन दारूने भरलेले मालट्रक पोलिसांना आढळून आले.
पोलिसांनी तात्काळ या दोन्ही मालट्रक थांबवून त्यात असलेल्या माला संदर्भात संबंधित चालकास विचारणा केली असता, त्या करून उडवा उडवीचे उत्तर मिळाल्यानंतर पोलिसांनी या ट्रक मधील सामानाची तपासणी केली, त्यामध्ये ट्रकमध्ये भाजीपाला कॅरेट दिसत होते मात्र सखोल तपासणी केली असता या भाजीच्या कॅरेट खाली मोठ्या प्रमाणात विदेशी प्रकारचा महागडा किमतीचा मद्यसाठा पोलिसांना आढळून आला.
पंजाब मध्ये अश्या प्रकारची दारू उत्पादन करून पंजाब राज्य सीमेअतंर्गत त्याची विक्री केली जाते मात्र पंजाबच्या बाहेर अवैध मार्गाने बाटलीवरील सील काढून व बारकोड मिटवून हि विक्री करण्याचा डाव या आरोपींचा असावा. कारण या रिव्ही क्वालिटीच्या दारू बाटलीचे सील व बारकोड काढून टाकण्यात आले होते. चोरटी वाहतूक करणाऱ्या संबंधित वाहन चालक व क्लीनर हे राजस्थान मधील असून त्यांना शिरपूर पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतले.
पोलिसांनी हा ट्रक ताब्यात घेतला असून जवळपास 55 लाख 37 हजार 280 रुपये किमतीचा दारुसाठा जप्त केला आहे,असून पुढील तपास शिरपूर पोलीस करीत आहेत.