नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
छ. संभाजीनगर/प्रतिनिधी – लोकसभा निवडणुकीचा शेवटच्या आणि पाचव्या टप्प्यातील निवडणूक तोंडावर आली आहे. त्यामुळे पोलिस आता अलर्ट मोडवर आले आहेत. याच पार्श्वभूमीवर देशासह राज्यात विविध ठिकाणी करण्यात आलेल्या छापेमारीत लाखों-करोडो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर मध्ये पोलिसांनी दोन युवकांना पैशांनी भरलेल्या बॅगसोबत ताब्यात घेतले.
छत्रपती संभाजीनगर शहरातील शिल्लेखाना चौकात दोन व्यक्ती दुचाकीवरून रोकड घेऊन जात असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त संपत शिंदे यांना मिळाली होती. त्यानंतर संपत शिंदे यांनी शिल्लेखाना चौकात सापळा लावत दोन आरोपींना ताब्यात घेतले. अर्जुन भास्कर मुंडलिक आणि सिद्धेश्वर अर्जुन मुंडलिक असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहे. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून 50 लाखांची रोकड जप्त केली. अटक केलेल्या तरूणांजवळ एवढी रोकड कुठून आणि कशासाठी आली याचा तपास पोलीस करत आहेत.