महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image ताज्या घडामोडी पोलिस टाइम्स

बावीस वर्षीय युवतीची प्रेमसंबंधातून गळा दाबून हत्या

नेशन न्यूज मराठी टीम.

वर्धा / प्रतिनिधी – स्त्री पुरुष प्रेम संबंधाना अजूनही मोकळेपणाने समाज मान्यता कमी प्रमाणत दिसून येते. शैक्षणिक वाटचाल सुरु असताना प्रेम व आकर्षण यातील जागरूकता युवा पिढीला असणे देखील गरजेचे आहे. तसेच कुठल्याही कारणास्तव नकार’ पचवता येणे देखील आवश्यक आहे. कौटुंबिक, सामाजिक दबावापोटी युवक युवतींना अशा प्रसंगाला एकट्याने सामोरे जावे लागते. कुटुंबात मोकळेपणे संवाद कमी घडत असल्याने भीतीपोटी नाती लपवण्याशिवाय या प्रेमी युगुलांना पर्याय नसतो. आणि यातूनच कधी कुटुंब सदस्याकडून तर कधी प्रेमाच्या नात्यातूनच हत्त्या घडते. अशीच घटना वर्धा येथे घडली आहे. वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर येथील जयभीम वॉर्डमध्ये राहणाऱ्या युवतीची प्रेम प्रकरणातून हत्या केल्याची धक्कादायक घटना गावात घडली. भरदिवसा दुपारचा फायदा घेत युवकांनी युवतीच्या घरात शिरून वायरने गळा दाबुन हत्या केली.

वय वर्षे २२ असलेली युवती नर्सिंगच्या तिसऱ्या वर्षाला यवतमाळला शिक्षण घेत होती. यवतमाळ वरून ती गावात आली होती. दुपारच्या वेळी घरी कोणी नसताना आरोपी युवक, आरोपी हा घरात घुसला व तू माझ्याशी का बोलत नाहीस असा वाद घालीत तिचा गळा वायरने आवरून तिला मारून टाकले. स्थानिक गुन्हे शाखा वर्धा व पोलीस निरीक्षक प्रफुल्ल डाहूले यांनी या प्रकरणाची कसून चौकशी सुरू केली व चोवीस तासातच या प्रकरणाचा छडा लावला आहे.

आरोपीला धामणगाव येथून अटक करण्यात आली. व विविध कलमासह आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. मृतक युवतीचे व आरोपीचे गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते घरच्यांना ते माहीत झाले होते. त्यामुळे तिला गावात आणले गेले होते. आरोपीचे व युवतीचे बोलणे गेल्या काही दिवसापासून बंद झाले होते. आरोपीने तू माझ्याशी का बोलत नाही तिच्यावर संशय घेत तिचा गळा आवळून तिला मारून टाकले अशी माहिती पोलिसांनी दिली.

पुढील तपास अल्लीपूर ठाणेदार प्रफूल्ल डाहूले करीत आहेत. बावीस वर्षीय युवतीची प्रेमसंबंधातून हत्या गळा दाबून केल्यामुळे संपूर्ण गाव हादरून गेले व युवतीची हत्या झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×