नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम.
सांगली/प्रतिनिधी – सांगलीच्या वसंतदादा पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर हळदीचे सौदे काढण्यात आले. दोन वर्षांपासून हळदीला दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता होती. यावर्षी मात्र उत्पादन आणि आवक कमी झाल्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला, आज काढण्यात आलेल्या सौद्यामध्ये राजापूर हळदीला १७ हजार १०१ रुपये दर प्रतिक्विंटल ला मिळाला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते.
सांगलीच्या मार्केट यार्डातील हळद गल्लीमध्ये प्रतिष्ठित व्यापाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सौदे संपन्न झाले. सीमा भागातून सध्या राजापुरी हळद मोठ्या प्रमाणात येत आहे. परराज्यातूनही रोज चार ते पाच हजार पोती हळद येत आहे. देशांतर्गत बाजारपेठेसह परदेशात हळदीची मागणी वाढली आहे. त्यामुळे हळदीचे दर टिकून आहेत.