नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
बुलढाणा/प्रतिनिधी – रानडुकराची शिकार करून मांस विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका इसमास वन विभागाने अटक केली आहे. त्याच्याकडून 19 किलो मांस व अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे. सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. बुलढाणा तालुक्यातील पळसखेड नागो येथील अजय वाघा राठोड असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून 19 किलो रान डुकराचे मांस, 2 सुरे, वजन काटा व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. आरोपी विरुद्ध विविध कलमान्वये वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास बुलढाणा वनपरिक्षेत्र अधिकारी अभिजित ठाकरे करत आहे. तर कारवाई नंतर जप्त केलेले मांस जाळून नष्ट करण्यात आले.