नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.
पनवेल/प्रतिनिधी – आज सकाळी नऊ वाजता पनवेल जुन्या महामार्गावर ट्रक पलटी झाला. हा ट्रक माल वाहतूक करणारा होता. या दुर्घटनेमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र या दुर्घटनेमुळे पनवेल जुन्या महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. सकाळी मोठ्या प्रमानात वाहनचालक महामार्गावरून प्रवास करतात. वाहतूक ठप्प झाल्यामुळे कामावर जाणाऱ्या प्रवाशांना अडचणींना सामोरे जावे लागले. कोन गाव पासून पळस्पे फाट्याकडे जाणारा रस्ता वाहनांनी जाम झाला होता. मोठ्या प्रमावर वाहनांच्या लांब रांगा लागल्या. त्यात उन्हाच्या तडाख्यामुळे तर नगरिकांना फार त्रास सहन करावा लागला. अजूनही वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरु आहे. लवकरच महामार्गावरील कोंडी कमी करण्यात येईल, आणि वाहतूक परत सुरळीत सुरू होईल.