महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
ताज्या घडामोडी पोलिस टाइम्स

ट्रकचालकाचा सुटला ताबा,ठाण्यात ट्रक आणि कारमध्ये जोरदार धडक

नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.

ठाणे/प्रतिनिधी – सकाळच्या सुमारास नाशिक-मुंबई महामार्गावर एक भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. हा अपघात ठाण्यातील मर्फी कंपनी बस स्टॉप समोर, होंडाई शोरूम जवळ, पाचपाखाडी, नाशिक-मुंबई महामार्ग, ठाणे (प.) या ठिकाणी नाशिकरोड कडून मुंबईकडे जाणाऱ्या महामार्गावर झाला. ट्रकचालकाचा वाहनावरील ताबा अचानक सुटल्याने त्याने तातडीने आपला ट्रक झाडाच्या दिशेने वळवला त्यामुळे ट्रक रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडावर आदळून रस्त्यावरच पलटी झाला व झाड ही पडले. त्यामुळे मोठा अपघात होण्यापसून वाचला पण या दुर्घटनेत अपघातग्रस्त वाहनाच्या मागून येणारे वाहन हे अपघातग्रस्त ट्रकच्या मागील बाजूस धडकल्याने अपघात झाला. सदर दुर्घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. शिवाय ट्रक आणि कार चालक सुरक्षित आहेत कोणालाही दुखापत झालेली नाही.

घटनास्थळी शहर वाहतूक पोलीस कर्मचारी, नौपाडा पोलीस कर्मचारी १-हायड्रा मशीनसह,आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे वाहन ०१-पिकअप वाहनासह तसेच अग्निशमन दलाचे जवान १-रेस्क्यू वाहनासह, १-फायर वाहनासह उपस्थित होते. अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.

अपघातानंतर नाशिक-मुंबई महामार्गावरील वाहतूक सुमारे १ तास रस्त्याच्या एका बाजूने संथ गतीने सुरू होती.त्यामुळे रोज या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या नगरिकांना थोडा त्रास सहन करावा लागला. पण लवकरच नौपाडा पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षेच्या टीम ने परिस्थितीवर नियंत्रन मिळवले.

Related Posts
Translate »
×