नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.
रत्नागिरी/प्रतिनिधी – मुंबई-गोवा महामार्गावर सकाळच्या सुमारास एका ट्रकला अचानक आग लागली. ट्रकला आग लागल्याचे लक्षात येताच ट्रकचालकाने क्षणभराचाही विचार न करता ट्रक थांबवून बाहेर उडी मारली. आग इतकी भीषण होती की लांजा शहाराजवळच हा ट्रक जळून खाक झाला. लांजा शहरामध्ये आग विझवण्यासाठी अग्निशमन बंब नसल्याने ट्रकचे मोठे नुकसान झाले. दुर्घटनेत जळालेला ट्रक गोव्याच्या दिशेने निघाला होता.
प्राथमिक माहितीनुसार या दुर्घटनेत कोणत्याही प्रकारची मनुष्यहानी झाली नाही. तसेच ट्रकला आग कशी लागली याचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही. या संपूर्ण दुर्घटनेत महामार्गावर गोंधळाची स्थिती निर्माण झाली.