नेशन न्यूज मराठी टीम.
अमरावती / प्रतिनिधी – अमरावती जिल्ह्यातील मेळघाट अतिदुर्गम भाग म्हणून समजला जातो. याठिकाणी मूलभूत सुविधांचा देखील अभाव आहे. रस्त्यांची पूर्ती चाळण झाली आहे. आदिवासींना सोयी सुविधा मिळाव्यात, यासाठी आदिवासींनी काही दिवसा अगोदर रस्ता रोको आंदोलन करून सरकारला इशारा दिला होता. तरी देखील प्रशासनाने आदिवासींच्या आंदोलनाची दखल घेतली नाही. त्यामुळे आज आपल्या समस्या मांडण्यासाठी आदिवासी बांधव जिल्हाधिकारी कार्यालयात धडकले.
जिल्हाधिकाऱ्यांसमोर आदिवासींना येत असलेल्या समस्या त्यांनी मांडल्या. मेळघाटमध्ये अजूनपर्यंत वीज पाणी रस्ता आणि मोबाईल नेटवर्क या सुविधा मिळत नाही आहे. आणि भारत सरकार आझादी का अमृत महोत्सव साजरा करत आहे. एकीकडे देश घर घर तिरंगा, मेरी माटी मेरा देश, समुद्धी महामार्गावर करोडो रुपय खर्च करीत आहे. मग मेळघाट मधल्या आदिवासी लोकांना सगळ्या सोयीसुविधा का नाही देत. यासाठी आज आदिवासी लोकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे विनवणी केली. मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा यावेळी आदिवासींनी दिला आहे.