महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image महाराष्ट्र

अतिदुर्गम पेंढरी व गट्टा येथे आदिवासी विकास महामंडळ चे धान खरेदी केंद्र सुरू

प्रतिनिधी.

गडचिरोली – तालुक्यातील पेंढरी व गट्टा बहुप्रलंबित धान खरेदी केंद्र येथे आदिवासी विकास महामंडळाचा वतीने धान खरेदी होत नसल्याने येथे मोठ्या प्रमाणात धान खरेदी.
करणारे व्यापारी यांचा रेलचेल वाढली होती.
व सर्वसामान्य शेतकऱ्यांना आपला धान अवा , सवा भावात विकणे भाग पडत होते.
या विषयी वारंवार आ, डॉ होळी यांच्याकडे तक्रार येत होती याची दखल घेऊन आमदार डॉ होळी यांनी तत्काळ जिल्हाधिकारी व मंत्रालय येथे पाठपुरावा करून सदर धान खरेदी केंद्र सुरू करायला लावले.
यामुळे या भागातील चाळीस पेक्षा जास्त गावांचा धान विक्री करण्याची समस्या निकाली
निघाला याकरिता या भागातील*शेतकरी बांधव यांनी आ. डॉ होळी यांचे जाहीर आभार मानले.
आज गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ देवराव होळी यांच्या पुढाकाराने आजपासून प्रारंभ या केंद्राचे उद्घाटन डॉ होळी यांनी केले
यावेळी प्रामुख्याने हेमंत पाटील बोरकुटे पेंढरि येथील भाजप युवा नेते पवन यरमे , संतोष भाऊ मंडल , दयानंद पवार , किसन लेनगुरे , परमेश्वर गावडे ,लकी सावकार ,बाबुराव गेडाम व शेकडो शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

Translate »
×